'दृश्यम' स्टाईल केलेला खून अखेर गुन्हेशाखेकडून उघडकीस

Image may contain: 10 people, people standing and indoorशिक्रापूर, ता.१५ ऑक्टोबर २०१९(सतीश केदारी) : दृश्यम सिनेमाप्रमाणे कुठलाही पुरावा न ठेवता केलेला खुन अखेर गुन्हेशाखेच्या पोलीसांनी कौशल्यपुर्ण तपास करत उघडकिस आणला असुन या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

Image may contain: 1 person, smiling, standing and outdoorशिक्रापूर येथील व्यावसायिक हनुमंत ऐवळे हे (दि.३) पासुन बेपत्ता होते.याबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशनला ऐवळे हे बेपत्ता असल्याची फिर्याद कुटुंबियांनी दिली होती.तर शिक्रापुर पोलीसांनीही बेपत्ता प्रकरण फारसे गांभिर्याने घेतले नसल्याचे परिसरात चर्चा होती. दरम्यान, (दि.१०) रोजी बुर्केगाव(ता.हवेली) येथील भिमा नदी पाञामध्ये एक पुरुष जातीचे प्रेत हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळुन आले होते.सदर मयताची ओळख पटविणे हे पोलीस यंञणेसमोर मोठे आव्हान होते.या प्रेताची ओळख पटविली असता हे प्रेत बेपत्ता हनुमंत यांचेच असल्याचे निष्पन्न झाले होते.मयत ओळख पटल्यानंतर खुनाचे कारण शोधणे व अनोळखी आरोपींना अटक करणे हे महत्वाचे अन क्लिष्ट काम पोलीसांसमोर होते.मारेक-यांनी खुन करताना कोणताही पुरावा मागे ठेवलेला नव्हता.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी तपासाची सुञे वेगाने फिरवत तपासासाठी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला सुचना दिल्या.यावेळी तपास करताना,सदरचा खुन हा आर्थिक कारणावरुन झाल्याचे निष्पन्न झाले.यावेळी पोलीसांनी सापळा रचुन सोमनाथ मारुती भुजबळ,सुमित संपत नरके(दोघेही रा.तळेगाव ढमढेरे) यांना ताब्यात घेतले त्यावेळी वरील दोन्ही आरोपींनी एक साथीदार याच्या समवेत आर्थिक वादामुळे खुन केल्याचे कबुल केले.

मयत हनुमंत ऐवळे यांच्याकडुन आरोपी सोमनाथ याने उसने पैसे घेतले होते.ते पैसे सोमनाथ भुजबळ हा देत नसल्याने त्यांच्यात काही दिवसांपुर्वी वाद झाला होता.नंतर सोमनाथ भुजबळ याने हनुमंत याचा काटा काढण्यासाठी त्याच्या मिञाच्या मदतीने दृश्यम सिनेमाप्रमाणे कट रचुन कोणताही पुरावा मागे न ठेवता हनुमंत यास महिंद्रा वाहनात बसवुन दोरीच्या साहाय्याने गळा आवळुन खुन करुन मृतदेहास दोरीने बांधुन त्याला दगड बांधुन भिमा नदीत टाकुन देउन पुरावा नष्ट केला होता.

आरोपींनी खुन करताना कोणताही पुरावा मागे न ठेवता अत्यंत हुशारीने गुन्हा केलेला होता.गुन्हा अत्यंत क्लिष्ट असुनही तांञिक व कौशल्यपुर्ण तपास करत खुनाचा गुन्हा उघडकिस आणला व आरोपींना गजाआड़ केले आहे. हा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्ताञय गुंड, दत्ताञय गिरमकर, राजु मोमीन, दयानंद लिमन, उमाकांत कुंजीर, विजय कांचन, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, धिरज जाधव, अक्षय जावळे यांनी करत खुनाचा उघडकिस आणण्यात मोलाची कामगिरी बजावली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या