गुंड, दोन नंबरवाले विरोधकांच्या बाजूने: अशोक पवार

Image may contain: 11 people, crowd and outdoor
लोणीकंद, ता. 17 ऑक्टोबर 2019 (योगेश मारणे): माझ्या सोबत शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य जनता आहे. तर, सर्व गुंड आणि दोन नंबरवाले विरोधकांच्या बाजूने एकवटले आहेत, अशी टीका शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार माजी आमदार अँड. अशोक पवार यांनी केली.

लोणीकंद (ता. हवेली) येथील श्री. म्हसोबा मंदिराच्या परिसरात झालेल्या प्रचारसभेत माजी आमदार अँड. अशोक पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, 'गेल्या ५९ महिन्यांत आमदार पाचर्णे यांनी फक्त गुंडांना व २ नंबरचे धंदे करणाऱ्या व्यक्तींनाच अभय दिले. त्यामुळेच ते लोक पाचर्णे यांच्या सोबत आहेत. आमदार पाचर्णे यांच्यावर निष्क्रियतेचा लागलेला कलंक पुसण्यासाठी ते शेवटच्या महिन्यात मतदार संघात फिरताना दिसत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनता आमदाराचे सर्व धंदे ओळखून आहे.'

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्याबाबत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे सरचिटणीस प्रदीप वसंत कंद म्हणाले, 'शरद पवार यांनी राजकारणातली सर्व पदे दिली. त्यांना सोडून जाण्याचा निर्णय हवेली तालुक्यातील ३९ गावांतील जनतेला आवडलेला नाही. सर्व जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी हवेली मधील जनता एकवटली आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल.'

यावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरकाका भूमकर, डॉ. चंद्रकांत कोलते, हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच श्रीमंत झुरुंगे, अनिल होले, हवेली तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस सोमनाथ कंद, राष्ट्रवादी युवतीच्या मोनिका झुरुंगे, हभप. हरिभाऊ झुरुंगे यांची भाषणे झाली.

याप्रसंगी हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा लोचन शिवले, घोडगंगा कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी, राहुल चोरघडे, सरपंच सागर गायकवाड, ओबीसी सेलचे सुभाष टिळेकर, संदीप गोते, रुपेश कंद, अर्जुन कांचन अनिल सोनवणे, पुष्पा कंद, रुपाली भूमकर, प्रतिभा कंद, रवींद्र कंद, मृणालिनी शिंदे, प्रीती शिंदे, सुनीता खलसे, शालन शिंदे, चंद्रकांत शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

लोणीकंद मधून राष्ट्रवादीला मताधिक्क्य देणार...
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस सोमनाथ कंद यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला लोणीकंद गावातून सर्वाधिक मताधिक्य देऊ. लोणीकंद गावाचा आजपर्यंत झालेला विकास केवळ शरद पवार यांच्यामुळे झाला. त्यांनीच गावात मोठमोठी पदे दिली, असे कंद यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या