Video: खुनशी राजकारणाला जनता कंटाळली: प्रदिप कंद

Image may contain: 7 people, people smiling, crowd, wedding and indoorवडगाव रासाई, ता.१७ ऑक्टोबर २०१९ (सतीश केदारी) : स्वत:ला कार्यसम्राट म्हणवणा-या अन खुनशी राजकारण करुन भांडणे लावून देणा-याला जनताच घरी बसवेल, असा  टोला जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी लगावला.

शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ मांडवगण फराटा-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या रॅलीला नागरिकांचा व युवकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

ते बोलताना म्हणाले कि, गेल्या पाच वर्षांत विद्यमान चेअरमनने गावा-गावांत पदाधिका-यांत भांडणे लावुन देण्याचे काम केले.तसेच जिरवा-जिरवी चे राजकारण अत्यंत खुनशी पद्धतीने केले.अशा खुनशी स्वभावामुळेच गेल्या पंचवार्षिक निवडणुकित कार्यसम्राट म्हणविणा-यांना जनतेने जागा दाखवुन दिली.परंतु आमदार बाबुराव पाचर्णे हे सर्वसामान्यांना सोबत घेउन जाणारे नेते आहेत.त्यांनी तालुक्यात कधीही भेदभाव केला नाही. म्हणूनच ते सहाव्यांदा आमदारकीसाठी पाञ ठरले आहेत. आमदार पाचर्णे यांचा विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित होणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके म्हणाले कि,शिरुर हवेलीत मोठया प्रमाणावर विकासकामे झाले आहेत. आमदार बाबुराव पाचर्णे यांनी ३०० कोंटीची विकासकामे भाजपा महायुतीच्या कार्यकाळात शिरुर हवेलीत मंजुर करुन घेतली असुन यापुढेही तालुक्याचा विकास पहायचा असेल तर आमदार पाचर्णे यांनाच निवडुन द्या व खुनशी चेअरमन अन जिरवा-जिरवीचे राजकारण करणा-याला हिच घरी बसवण्याची योग्य वेळ आली आहे असे ते म्हणाले.

यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादापाटील फराटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, सचिन शेलार, काकासो खळदकर, विरेंद्र शेलार, शिवाजी शेलार, रामचंद्र निंबाळकर, पोपट शेलार, प्रमोद ढवळे, दादा ढवळे, तात्यासो ढवळे, भानुदास ढवळे, भाउसाहेब यादव, रोहन निंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या