तब्बल 22 वर्षांपासून फरार असलेले दरोडेखोर जेरबंद

Image may contain: one or more people
शिरूर, ता. 18 ऑक्टोबर 2019: 22 वर्षांपासून फरार असलेले दरोडेखोर राजकमल उर्फ वाल्मीकी जयसिग उर्फ जागडी कंजारभर उर्फ बिरावत (वय 55) व मोरसिंग गांडा उर्फ साबसिंग कंजारभट उर्फ बिरावत (वय 57, दोघो रा. खुटबाव ता, दौंड सध्या रा. पिंपळे जगताप ता. शिरूर) यांना जेरबंद करण्यात आले आहे. दोघेही कुख्यात दरोडेखोर ज्वालासिंग टोळीतील असल्याचे पुणे ग्रामिण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर धनवट यांनी सांगीतले.

24 जूलै 1996 रोजी उदगीर आगारातील बस (क्र. एम एच 12 डी 2796) शिवजानगर (पुणे) येथून उदगीरला जात होती. यवत (ता. दौंड) गावातून पुढे सुमारे पाच किमी अंतरावर गेल्यावर ही बस पंक्चर झाली. त्यातील प्रवाशी, चालक व वाहक खाली उतरले असता. सुमारे दहा दरोडेखोरांनी हल्ला केली. वाहका जवळील तिकीटांचे पैशे असलेली बॅग, गंगुबाई कुसाळकर (रा. लातूर) या महिलेच्या गळ्यातील मगळसुत्र हिसकाऊन घेतले. पुणे-सोलापूर महामार्गावर हा प्रकार सुरू असतानाच रात्र गस्त करणाऱ्या यवत पोलिसांची गाडी तेथे आली. त्यांना पाहून दरोडेखोरांनी पळ काढला. मात्र, तरीही पोलिसांनी त्यातील (मारूती दादा कंजारभट रा. खुटबाव, ता. दौंड) एकास पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर पोलिसांनी एकेक करत पुन्हा सहा आरोपी पकडण्यात यश मिळवले. तीन आरोपी मात्र तेंव्हापासून फरार होते.

दरम्यान, शिक्रापूर भागात नाव बदलून राहात असलेल्या यांतील दोन आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. यांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीच झालेल्या गुन्ह्याच्या पुढील कारवाईसाठी या आरोपींना यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर धनवट यांच्या मार्गदर्शना खाली सदरची कारवाई करण्यात आली. या पथकात महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांचा समावेश होता.

ज्वालासिंग कोण?
ज्वालासिंग टोळीचा म्होरक्या ज्वालासिंग कंजारभट आंतरराज्य स्तरावरील कुख्यात दरोडेखोर असून, त्याच्यावर या आधी महाराष्ट्रासह परराज्यात केलेला खून, दरोडा, जबरी चोरी अशा प्रकारचे सुमारे 150 हून अधिक गुन्हे आहेत. पोलिस आपला इनकाऊंटर करतील या भितीने 1999 मध्ये ज्वालासिंग पोलिसांना शरण आला. सध्या तो शिक्रापूर पोलिसांच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात येरवढा जेलची हवा खात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या