शिरूर तालुक्यात अवैध धंद्यावर पोलिसांचा छापे

Image result for maharashtra policeशिरूर, ता. 19 ऑक्टोबर 2019: शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी व रांजणगाव गणपती येथे अवैध धंद्यावर पोलिसांनी छापे टाकले. यामध्ये दारूचा बेकायदा साठा नष्ट केला.

निमगाव भोगी येथे अवैध दारू धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 22 हजारांचा माल उद्‌ध्वस्त केला. निमगाव भोगी येथील ओढ्यालगतच्या शेताजवळ असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून दारू बनविण्याचा सुमारे 1 लाख 22 हजार 500 रुपयांचा माल जागीच नष्ट करण्यात आला. भट्टीमालक व अन्य दोन, अशा तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. येथील गीतांजली हॉटेल येथे टाकलेल्या धाडीत देशी-विदेशी दारूचे सुमारे 52 हजार 556 रुपये किमतीचे 10 बॉक्‍स जप्त करून बेकायदा विक्री करताना चरणजित विश्‍वास या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, सहायक फौजदार सुधाकर कोळेकर, पोलिस हवालदार तुषार पंधारे, अजित भुजबळ, गणेश सुतार, ज्ञानेश्वर शिंदे व होमगार्ड विशाल फरांदे व प्रिया गव्हाणे यांनी सहभाग घेतला.

निमगाव भोगी जवळ गावठी दारू गाळणाऱ्या हातभट्टीवर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून भट्टी उद्‌ध्वस्त केली. याप्रकरणी नीलेश गुणाजी लोंढे व गुणाजी खंडू लोंढे (दोघे रा. निमगाव भोगी) यांच्यासह हातभट्टीवरील कामगारावर गुन्हा दाखल केला. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, सहायक फौजदार एस. डी. कोळेकर, पोलिस कॉन्स्टेबल गणेश सुतार यांच्या पथकाने बुधवारी (ता. 16) दुपारी हा छापा टाकला. दहा लिटर गावठी हातभट्टी दारू, काळ्या गुळाच्या ढेपा, प्लॅस्टिकचे बॅरेल, दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे मोठे लोखंडी पात्र असे मिळून एक लाख 22 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. लोंढे पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.

रांजणगावातही कारवाई...
रांजणगाव गणपती येथील हॉटेल गीतांजलीमध्ये देशी-विदेशी दारूचा बेकायदा साठा असल्याची माहिती समजल्याने तुषार पंदारे, मंगेश थिगळे, अजित भुजबळ या पोलिस पथकाने बुधवारी सायंकाळी छापा घालून सुमारे 52 हजार रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. चरणजित स्वपन बिस्वास व बिपलन स्वपन बिस्वास (रा. रांजणगाव, मूळ रा. पश्‍चिम बंगाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या