Video: पत्रकाराला धमकी म्हणजे सत्तेची मस्ती: डॉ. कोल्हे

Image may contain: 1 person
शिरूर, ता. 19 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): वढू-बुद्रूक रस्त्याची पोलखेल केली म्हणून पत्रकार बांधवाला धमकी देणे ही लोकशाहीला मारक आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेली असेल तर ती उतरवण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
आमची सर्वत्र सत्ता असताना कधीही सत्तेचा माज येऊ दिला नाही. कधीही सूडाचे राजकारण केले नाही. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना संप करावा लागला, शेतकऱ्यांना साले म्हणून घ्यावे लागले. भाजप अतिशय खालच्या पातळीवरचे, नीच पद्धतीचे राजकारण करीत आहेत. राज्यात आघाडीची सत्ता आल्यास तीन महिन्यात संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्‍वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव नाही. धरणे शंभर टक्के भरलेली असताना देखील यांना शेतकऱ्यांना पाणी देता आले नाही. या सरकारने आरोग्य, कृषी, ग्रामविकास, पोलिस, शिक्षण या प्रत्येक खात्यात नोकर भरती थांबविल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. भाजप अतिशय खालच्या पातळीवरचे, नीच पद्धतीचे राजकारण करीत आहेत. राज्यात आघाडीची सत्ता आल्यास तीन महिन्यात संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्‍वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्यांची खिल्ली उडवत अजित पवार म्हणाले, "एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, दिलीप कांबळे या भाजपच्या निष्ठावंतांवर भाजपने जातीपातीचे राजकारण करून वाईट दिवस आणले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपत गेलेल्या जित्राबांचं काही खरं नाही. ते वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडून गेलेले आहेत.''

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा 'रोड शो'...
शिरूर मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. अमोल कोल्हे व प्रकाश धारिवाल यांनी शहरात "रोड शो' केला. शिरूरकरांनी या रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर हा "रोड शो' सुरू झाला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या "रोड शो'च्या पुढे ठिकठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसेवा मंदिराजवळ या रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीदरम्यान ऍड. पवार यांनी शहर व परिसरातील अनेक ज्येष्ठांच्या गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या