शिरुर हवेलीत ३८९ मतदान केंद्रांसाठी २४४७ कर्मचारी

Image may contain: phoneशिरूर, ता.२० ऑक्टोबर २०१९ (प्रतिनीधी) :  198-शिरुर हवेली विधानसभा मतदार संघासाठी  सोमवार(दि.२१)रोजी मतदान होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.
 
यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, 198-शिरुर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक अनुषंगाने (दि.२०)रोजी कुकडी  हॉल शिरूर येथून मतदान पथके रवाना होणार आहे.शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण मतदारांची संख्या 383886 एवढी असुन त्यात पुरुष मतदार 200382 तर महिला मतदार एक लाख 82 हजार 492 असे मिळून एकूण तीन लाख 83 हजार 886 एवढे मतदार आहेत.शिरूर हवेली मतदानासाठी शिरूर हवेली तालुक्यातील एकूण सात मंडल भागा अंतर्गत मूळ 376,सहाय्यकारी 13,अशी एकूण 389 मतदान केंद्राचा समावेश आहे.तसेच एकूण 30 झोन आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर मतदान पथके ने आण  करण्यासाठी एकूण 87 वाहनांचा वापर केला जाणार असून या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी असे एकूण 2547 कर्मचारी काम करणार असल्याची माहिती श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या