मतदान करण्यासाठी तुमच्याकडे हवीत ही 11 ओळखपत्रे

Image may contain: one or more people
शिरूर, ता. 20 ऑक्टोबर 2019 : मतदारयादीमध्ये नाव आहे; मात्र मतदान ओळखपत्र नाही अशा मतदारांना आता इतर 11 छायांकित ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे. हा निर्णय मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतल्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

मतदारयादीत नाव असते; परंतु मतदानकार्ड नसते; तसेच मतदारयादीत नव्याने नावाचा समावेश झालेला असतो; परंतु मतदान ओळखपत्र मिळलेले नसल्याने अनेकदा मतदान करता येत नाही. परिणामी मतदानाची टक्केवारी घटते. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदान ओळखपत्रासह इतर 11 छायांकित ओळखपत्रांना मतदान करण्यासाठी पुरावा म्हणून मान्यता दिली आहे.

यात पासपोर्ट, वाहनचालक परवाना, केंद्र किंवा राज्य शासन किंवा सार्वजनिक उपक्रम किंवा सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तऐवेज, खासदार आमदार-विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यांचा समावेश आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव आहे; मात्र ओळखपत्र नाही, म्हणून कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, म्हणून इतर 11 छायांकित ओळखपत्रांचा पुरावा गृहीत धरला जाणार आहे.

मोबाईल फोन, कॅमेरा, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व गॅझेट यांचा वापर करण्यास भारत निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली असल्याने या दिवशी कोणीही मतदान केंद्रांवर मोबाईल वापरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदान करण्यासाठी मतदारांकडे मतदान ओळखपत्र आवश्‍यक असून ते नसल्यास पारपत्र, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, एपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृतीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड आदींपैकी कोणतेही एक दस्तावेज हे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाहीत.

मतदारयादीत नाव असणे आवश्‍यक
केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही, तर मतदारयादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्‍यक आहे. याबाबत मतदारांनी आपले नाव नोंदणी अथवा पडताळणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांना देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही; तर त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र अथवा वर दिलेल्या 11 दस्ताऐवजांपैकी कोणतेही एक दस्तावेज सादर करणे आवश्‍यक राहील. प्रवासी भारतीयांनी ओळख म्हणून केवळ पासपोर्टची मूळ प्रत सादर करणे आवश्‍यक असेल, असेही कळविण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या