शिरुर हवेलीत शांततेत मतदान प्रक्रिया सुरु(Live)

Image may contain: phoneशिरुर,ता.२१ अॉक्टोबर २०१९(सतीश केदारी) : शिरुर हवेलीत शांततेत मतदान प्रक्रिया सुरु झाली असुन सकाळी अकरापर्यंत १४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.ग्रामीण भागासह शहरात नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत.

शिरुर हवेलीत सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली.गेल्या दोन दिवसांत तालुक्यात सातत्याने मुसळधार पाउस पडत होता, माञ सोमवारी सकाळपासुन उघडीप दिली.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत.सकाळी नउ वाजेपर्यंत ३.७६ टक्के तर अकरा पर्यंत १४.५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे  यांनी दिली.शिरुर तालुक्यात ग्रामीण भागात सकाळी नउ नंतर नागरिकांनी गर्दी केली होती तर शहरात आठ नंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावुन मतदान केले आहे.

दरम्यान शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघात कोठेही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी शिरुर तालुक्यातील मतदान केंद्रांवर भेटी देत मतदान प्रक्रिया व बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या