शिरूर विधानसभेचा अंदाज काय असेल बरं?

Image may contain: outdoor
शिरूर, ता. 23 ऑक्टोबर 2019:
शिरूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार बाबूराव पाचर्णे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार ऍड. अशोक पवार यांच्यातील तुल्यबळ लढत होत आहे. पाचर्णे व पवार या आजी-माजी आमदारांसह दहा उमेदवारांबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
 
आमदार पाचर्णे व माजी आमदार पवार यांच्यातील ही तिसरी लढत असून, यापूर्वीच्या दोन लढतींत दोघांनाही हार-जीतचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत दोघांनीही सर्वस्व पणाला लावल्याचे चित्र दिसून आले. 2009 पूर्वी पाचर्णे हे भाजपचे आमदार होते. त्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करूनही पक्षाने त्यांच्याऐवजी ऍड. पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संतापलेल्या पाचर्णे यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र त्यात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी स्वगृही (भाजपमध्ये) येत पुन्हा उमेदवारी आणि सोबत विजय संपादन केला. गेली पाच वर्षे त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा वारंवार झडल्या. मात्र पाच वर्षे उलटल्यानंतरही त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. या वेळी विजय मिळाल्यास मंत्रिपद मिळणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते व समर्थक छातीठोकपणे सांगत असून, तसा प्रचार निवडणुकीदरम्यान केला गेला. "तुम्ही यंदा आमदार नाही, तर मंत्री निवडणार' असा प्रचारही केला गेला. भाजपमधील "इनकमिंग'नेही पाचर्णेंच्या गोटात निवडणुकीपूर्वीपासून उत्साहाचे वातावरण पसरले, ते आज मतदानापर्यंत कायम होते.

तुम्हाला काय वाटते? जरूर व्यक्त व्हा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या