शिरुर-हवेलीचं चिञ दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट होणार

Image may contain: 2 people, tree, outdoor and natureशिरुर,ता.२३ अॉक्टोबर २०१९(सतीश केदारी) : शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात मतमोजणी प्रक्रिया सुरळित पार पाडण्यासाठी निवडणुक प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघात ६७.२१ टक्के मतदान झाले असुन शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा इच्छुक उमेदवारांचा फैसला गुरुवार(दि.२४) रोजी होणार आहे.सकाळी आठ वाजले पासुन शिरुर येथील कुकडी वसाहत येथे प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार असुन मतमोजणी प्रक्रिया १४ टेबल वर होणार असुन २८ मतमोजणी च्या फे-या होणार आहे.ही मतमोजणी प्रक्रिया सुरळित पार पडण्यासाठी सुमारे १०० कर्मचा-यांची नेमणुक केली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.साधारणपणे दुपारी एक पर्यंत शिरुर-हवेलीचा निकाल स्पष्ट होइल.

दरम्यान,शिरुर पोलीसांकडुन मतमोजणी दरम्यान अनुचित प्रकार घडु नये यासाठी १ उपविभागीय पोलीस अधिकारी,४ पोलीस निरीक्षक,१०० ग्रामीण पोलीस कर्मचारी,१ वज्र वाहन,१ शिघ्र कृती दलाची तुकडी,२० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल व रेल्वे पोलीस बल-४५ असा तगडा बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिली.

शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे,राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार,मनसेचे कैलास नरके,वंचित विकास आघाडीकडुन चंदन सोंडेकर यां प्रमुख पक्षांसह रघुनाथ भवार,अमोल लोंढे,चंद्रशेखर घाडगे,अॅड.नरेंद्र वाघमारे,नितीन पवार,सुधीर पुंगलिया हे उमेदवार निवडणुक लढवत असुन या उमेदवारांचा फैसला गुरुवार(दि.२३) रोजी होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या