शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निकालात चुरस(Live)

शिरुर,ता.२४ अॉक्टोबर २०१९(सतीश केदारी) : शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे सर्वस्व पणाला लागले असुन अत्यंत चुरशीने लढत सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे व राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे.

सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया कुकडी वसाहत येथे सुरु करण्यात आली.सकाळी पहिल्या फेरीपासुन ते अकराव्या फेरी अखेर माजी आमदार अशोक पवार मताधिक्याने  १५३८४  पुढे आहे.दरम्यान मतमोजणी दरम्यान अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवला असुन दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी कुकडी वसाहत येथे गर्दी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या