शिरूर भाजप तालुका अध्यक्षांचा राजीनामा

Image may contain: 1 person, smiling, closeupशिक्रापूर, ता. 25 ऑक्टोबर 2019 (विशाल वर्पे): शिरुर-हवेली मतदार संघात भाजपचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांचा पराभव झाल्याने शिरुर-हवेलीत भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. पराभवाची जबाबदारी स्विकारत भाजपचे तालुका अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके यांनी राजीनामा दिला आहे.

शिरूर-हवेली मतदार संघाचे आमदार बाबूराव पाचर्णे हे पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवत होते. मात्र. राष्ट्रवादीच्या अशोक पवार यांनी पाचर्णे यांचा तब्बल ४१ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे तालुका अध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य भगवान शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्याकडे पाठवला आहे. यापुढे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या