जनशक्तीपुढे धनशक्तीचा झालेला हा विजय: बाबूराव पाचर्णे

Image may contain: 1 person, smiling, sittingशिरूर, ता. 25 ऑक्टोबर 2019: शिरूर-हवेली मतदार संघातील सुमारे एक लाख मतदार आमच्या पाठीशी उभे राहिले; तथापि, पराभवाच्या धास्तीने राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पैशांचा धुरळा केला. "जनशक्तीपुढे धनशक्तीचा झालेला हा विजय आहे' अशी प्रतिक्रिया शिरूर मतदार संघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, "गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून शिरूर-हवेलीच्या विकासासाठी तब्बल तीन हजार कोटी रूपयांची कामे मंजूर करून आणली. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून, अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. मात्र, धनशक्तीच्या धुरळ्यापुढे ही विकासकामे फोल ठरली असे वाटते. प्रचारकाळात आम्ही मतदारांसमोर विकासकामे मांडली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मांडल्या. विकासकामांच्या बळावर लोकांच्या विश्‍वासास पात्र ठरू असे वाटले होते. मात्र, विरोधकांनी पैशांचा बाजार मांडला. त्याला काही प्रमाणात जनता भुलली.''

प्रतिस्पर्धी उमेदवाराने मतदार संघात पैशांच्या जोरावर दहशतीचे वातावरण निर्माण केले. याला बघून घेऊ, त्याला बघून घेऊ असा नेहमीचा फंडा वापरला. त्यामुळे भयाची स्थिती निर्माण झाली. प्रत्येक निवडणुकीत पैशांचा जोर केला त्यालाही जनमत काही प्रमाणात बधले असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या