पिंपळे-जगताप येथे टेम्पो चारचाकीवर पडला पण...

Image may contain: car and outdoor
शिक्रापूर, ता. 27 ऑक्टोबर 2019 : पिंपळे-जगताप (ता. शिरूर) हद्दीतील चौफुला येथे शनिवारी (ता. 26) सकाळी खड्डा चुकविताना टेंपोचे चाक खड्ड्यात गेल्याने तो चारचाकीवर उलटला. सुदैवाने स्थानिकांमुळे मोटारीमधील चौघांचा जीव बचावला आहे. मात्र, मोटारीचा चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणी (ता. मुळशी) येथील आदिनाथ कचरू राख (वय 29), पत्नी कोमल राख, सात वर्षीय मुलगा तसेच दीड महिन्याची एक मुलगी हे चौघे चाकणहून बीडकडे शनिवारी सकाळी चारचाकीतून (एमएच 23, एयू 5499) निघाले होते.

पिंपळे-जगताप येथे मागून येणारा अवजड साहित्याने भरलेला टेंपो (एमएच 12, एफझेड 7928) खड्डे चुकवत शेजारून जाताना एक चाक खड्ड्यात गेले आणि तो चारचाकीवर कोसळू लागला. हे पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चारचाकीतील चौघांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातात कोमल राख या किरकोळ जखमी झाल्या आहे. यात चारचाकीचा चक्काचूर झाला असून घटनेनंतर टेंपोचालक फरारी झाला आहे.

घटनेनंतर भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, शिवसेनेचे शाखाप्रमुख स्वप्नील शेळके आदींनी जखमी राख कुटुंबीयांना तातडीने मदत केली. वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वप्नील शेळके व युवा कार्यकर्त्यांनी दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या