अशोक पवारांनी घेतले संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

No photo description available.
शिक्रापूर,ता ३० ऑक्टोबर २०१९ (विशाल वर्पे): शिरुर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ऍड अशोक पवार यांनी वढु बु. (ता. शिरूर) येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन ग्रामस्थांचे आभार मानले मात्र वढु बु. गावातून मतांची आघाडी मिळाली नसल्याने खंत व्यक्त केली.

शिरुर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचा ४१ हजार मतांनी पराभव केल्यानंतर अशोक पवार हे मतदार संघातल्या प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांचे आभार मानत आहेत.आज सकाळीआमदार अशोक पवार यांनी वढु बु. येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन गावातील ग्रामस्थांचे आभार मानले. त्यावेळेस बोलताना ते म्हणाले माजी आमदारांनी वढु बु. हे गाव दत्तक घेतले होते मात्र गेल्या ५ वर्षात या गावात कोणताही विकास झाला नाही.पूर्वी मी आमदार असताना केलेले रस्ते अजूनही तसेच आहेत. रस्त्यावरील खड्डे देखील मागच्या आमदारांनी बुजवले नाही. तरीसुद्धा ग्रामस्थांनी त्याच उमेदवाराला मतांची आघाडी दिल्याची खंत आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली.
 
यावेळेस जि.प.सदस्या सविता बगाटे,पं.स.सदस्या सविता पऱ्हाड,सुजाता पवार,दिलीप वाल्हेकर,राजेंद्र नरवडे,शंकर भूमकर ,प्रदीप वसंत कंद उपस्थित होते.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग आरगडे यांनी अशोक पवार यांच्याकडे सविता पऱ्हाड यांना पंचायत समितीच्या उपसभापती पदी संधी द्यावी अशी मागणी केली असता पवार यांनी हा निर्णय दिलीप वळसे पाटील हेच घेतील असे सुचविले.

यावेळी गावच्या वतीने नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांचा सन्मान साहेबराव भंडारे,भाऊसाहेब शिवले,हनुमंत शिवले,महादेव भंडारे,अशोक भंडारे, सचिन भंडारे यांच्या हस्ते करण्यात आला तर वाजेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आण्णासाहेब मांजरे,अनिल वाजे यांनी सन्मान केला.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या