सैनिकांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी...

Image may contain: 8 people, people smiling, people standing and indoorनिमगाव म्हाळुंगी, ता. 31 ऑक्टोबर 2019 (संपत कारकूड): देशाच्या विविध सीमेवर सेवा बजावत असलेल्या जवानांच्या घरी जावून दिवाळी साजरी करुन कुटुंबाला शुभेच्छा व समाजाला प्रेरणा देण्याचा कार्यक्रम समस्त हिंदु महासभा, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे व शिवराज्य प्रतिष्ठाण निमगाव म्हाळुंगीचे अध्यक्ष बापुसाहेब काळे यांच्या सयुक्त संकल्पनेतून येथे साजरा करण्यात आला.

पाच वर्षांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये हा उपक्रमाचे राबविला जात आहे. आपले कुटुंब सोडून सीमेवर देशसेवेचे महान कार्य प्रामाणिकपणे बजावत असलेल्या सैनिकांना दिवाळीत सुट्टी मिळेलच असे नाही. त्यांच्याविना घरच्यांना दिवाळी साजरी करावी लागते ही जाणीव ठेवून जवानांविषयी समाजात कर्तव्य भावनेचा संदेश जावा या उददेषाने सैनिकांच्या घरी जावून दिवाळी साजरी केली जात असल्याचे एकबोटे यांनी सांगितले.

देशाचे खरे रक्षक जवान आहेत. त्यांचा मान, सन्मान वाढविला पाहिजे. समाजामध्ये त्यांच्याविषयी आदर व प्रेमभावना जागृत व्हावी हा मुख्य संदेश घेवून तालुकाभर हा उपक्रम राबवित असल्याचे एकबोटे यांनी सांगितले. जवानामध्ये देशभक्ती व शिस्त असल्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांचा समाजाला उपयोग होतो, असे विचार जवान तुकाराम डफळ यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात रांगोळीकार किशोर भिकुले, नगारावादक रोहित आढाव, सुखदेवआप्पा रणसिंग, किरणशेठ काळे, महेश गोसावी, रत्नदिप स्वामी यांनी सहभाग घेतला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या