शिरूर तालुक्यातील अंध युवकांची सीमेवर दिवाळी

No photo description available.
तळेगाव ढमढेरे, ता. 1 नोव्हेंबर २०१९ (जालिंदर अदक): प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड टीमच्या वतीने पंजाब येथील फाझीलका जिल्यातील सादकी बॉर्डरवर बिएसएफ च्या पुणे येथील अंध युवकांनी जवानांसोबत दिवाळीसाजरी करण्यात आली.

भारतीय सिमेवरील जवानांना घरच्या सणांना येणे शक्य होत नाही दिवाळीच्या मुख्य सणाबरोबर अनेक सणांना भारतीय सैनिकांना दुर राहावे लागत असल्याचे लक्षात घेऊन एक अनोखा सण साजरा करण्यासाठी पुण्यातील ३ अंध मुली आणि ४ अंध मुले आणि इतर ५ असे एकूण १२ जणांनी पुण्याहून २७ ऑक्टोबरला पंजाब कडे रवाना झाले होते.

भाऊबीजेच्या दिवशी दि.२९ रोजी सैनिका सोबत भाऊबीज साजरी करण्यात आली त्यावेळी अंध मुलींनी सैनिकांना ओवाळले आणि सर्वांनी सैनिकांना मिठाई वाटुन दिवाळीचा आनंद साजरा केला. प्रेरणा ग्रुपचे सचिव सतीश नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जण यामध्ये सहभागी झाले. या संस्थेचे बॉर्डरवर दिवाळी साजरी करण्याचे हे १७ वे वर्ष आहे. शिरूर तालुक्यातील कासारी मुळ गावचे सुपुत्र सतीश नवले स्वतः अंध असूनही या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करतात.

गेल्या सोळा वर्षापासुन हि सेवा करत असताना आम्हांला खुप समाधान मिळत असल्याचे सतीश नवले यांनी सांगितले उपक्रमनाने त्यांचे सर्व भागांतून कौतुक होत आहे यावेळी त्यांच्या बरोबर कासारी वि.का.सोसायटीचे चेअरमन राजेंद्र काकडे, माजी सैनिक रोहिदास नवले हे त्यावेळी सहभागी झाले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या