शिरूर तालुक्यातील बडे नेते गारद? नोंदवा मत...

शिरूर, ता. 1 नोव्हेंबर 2019: विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शिरूर तालुक्यातील बडे नेते गारद झाले आहेत, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते, याबद्दल जरूर मत नोंदवा.

शिरूर-हवेलीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार विजयी झाले. पवार यांचा विजयानंतर चर्चांना उधान आले आहे. पवार यांचा पराभव करण्यासाठी शिरूर तालुक्यातील बडे नेते त्यांच्या विरोधात प्रचार करत होते. परंतु, पवार विजयी झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. "अशोकबापू आमदार झाल्यास आपल्या राजकारणाचे काही खरे नाही, आपले राजकीय भवितव्य संपेल,' या भयाने पछाडलेल्या या "बड्या नेत्यांनी'ही त्यांना पाडण्यासाठी जीवतोड मेहनत केली. त्यासाठी प्रसंगी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून पाहिला. पवारांच्या विरोधात डांगोरा पिटून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे हे कारनामे कुठेच फळाला आले नाहीत. या "बड्या नेत्यांची' खेळी यशस्वी होऊ शकली नसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आले.

या बड्या नेत्यांबद्दल आपल्याला काय वाटते याबद्दल जरूर व्यक्त व्हा, शिवाय मतही नोंदवा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या