तळेगाव ढमढेरे येथे जास्त दराने गॅस सिलेंडर विक्री

तळेगाव ढमढेरे, ता. ४ नोव्हेंबर २०१९ (जालिंदर आदक): येथील HP वितरक ग्राहकांकडून वीस रुपये जास्त घेत असल्याचे निदर्शनास आले असून  ग्राहकांनीच याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे विनाकारण ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे HP एजन्सीचे दुगड यांचे उपवितरण कार्यालय असून या ठिकाणी ग्राहकांना प्रत्येकी टाकी मागे २० रुपये जादा दराने पैसे द्यावे लागत आठवड्यातुन दोन वेळा गुरुवारी आणि रविवारी गॅस भरून गाडी येत असते एका वेळेस ७० टाक्या आणल्या जातात, एका महिन्यात ५६०० जास्त लाटले जातात नक्की हे पैसे घेतो कोण हे संशोधनाचा गंभीर विषय बनला आहे,असे गेल्या अनेक दिवस चालत आहे, यावर दक्षता समितीचे दुर्लक्ष होत आहे.

ग्राहकांचा होणारा आर्थिक तोटा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून सध्या लोकसंख्येचा विचार करता जास्त लागणारे सिलेंडर टाक्या आणि वाढत्या रहदारीमुळे लागणारे सिलेंडर तुटवडा पडत आहे. यामुळे नागरिकांना काळ्या बाजाराच्या भावाने गॅस सिलेंडर टाकी विकत घेण्याची वेळ आली आहे.त्यातच येथील वितरक ग्राहकाकडून २० रुपया पासून तर ५० रुपये पर्यंत आगाऊ रक्कम घेत असलेले निदर्शनास आले आहे यावर संबंधित पुरवठा विभागाने आजपर्यंत कारवाई का केली नाही याचे नवलच वाटत आहे, अशा प्रवृत्तीसाठी सक्षम कारवाई कोणता अधिकारी करेल याकडे लक्ष नागरिकांचे आहे.

या ठिकाणी भरलेल्या सिलेंडरचे वजन करण्यासाठी वजन काटा उपलब्ध नाही, वारंवार गळक्या सिलेंडर बदली करण्यासाठी ग्राहकांना होणारी हेळसांड त्यातून होणारा वाद हा नित्याचा ठरलेला आहे. सिलेंडर उतरवताना कर्मचारी गाडीतून सिलेंडर फेकत असतो यामुळे पुढील होणारा अपघात याला जबाबदार कोण असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

पावती मिळण्यासाठी ग्राहकांना वेठीस धरले जात आहे परंतु पावती मिळत नाही यामुळे मुळ सिलेंडरची किंमत कळत नाही आणि यामुळेच ग्राहकांकडून जादा दराने उकळणी केली जाते.गेल्या तीन वर्षांपूर्वी पुरवठा विभागाने काळा बाजारात विक्री करणारे रॅकेटवर मोठी कारवाई केली होती, परंतु आता सुळसुळाट वाढला असूनही कारवाई का होत नाही यावरून अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शन होत असल्यामुळे कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिक करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या