फक्त अश्रू: माझ्या पप्पांना फोन लावाना...

वाघाळे, ता. 7 नोव्हेंबर 2019: काहीतरी घडलंय, पण काय घडलंय ते कळत नाही. पप्पांना अपघात झालाय अन् त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, एवढीच तिला माहित. चेहरा कावरा-बावरा झालेला. माझ्या पप्पांना फोन लावाना... तिने मोबाईल नंबर सांगितला. पण, फोन बंद. पप्पांशी दोन शब्द बोलण्यासाठी तिची तळमळ. परंत, दुसऱया मोबाईलवरून फोन लावला. पण बंद. तिला काही-काही माहिती नव्हते....

वाघाळे (ता. शिरूर) येथील युवा शेतकरी भिवाजी बबन शेळके (वय 42) बुधवारी (ता. 6) कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून दुपारी बाराच्या सुमारास विजेचा प्रवाह हातामध्ये धरून आत्महत्या केली. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा तडफडून मृत्यू झाला होता.

भिवाजी यांना दोन मुले. अपघातावेळी दोन्ही मुले शाळेत गेली होती. मुलगी बारावीत तर मुलगा आठवीमध्ये शिकत आहे. वडिलांना फक्त अपघात झाला आहे अन् उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुलीला शाळा सुटल्यानंतर समजली.

शाळा सुटल्यानंतर मुलीने रस्त्याने आपल्या घराची वाट धरली. पण, तिला काहीतरी जाणवत होते. रस्त्यावरून जात असताना ओळखीच्यांना पप्पांचा मोबाईल नंबर सांगून फोन लावायला सांगत होती. फोन लावणाऱयांना घडलेल्या घटनेबाबत माहित होते. पण, तिला कोणी काही कळू देत नव्हते. मोबाईल लावल्यानंतर बंद असल्याचे समजत होते. माझ्या पप्पांचा फोन बंद लागतोय... पुन्हा जरा वेळाने दुसऱया मोबाईलवरून प्रयत्न करत होती. पुन्हा मोबाईल बंद. तिचा चेहरा कावरा-बावरा झाला होता. फोन लागत नसल्यामुळे तिने घराची वाट धरली....

पप्पांचा फोन लागत नसल्याचे सांगितल्यानंतर व ती पाठमोरी झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात नकळत अश्रू वाहू लागले. पप्पांवरी प्रेम दिसत होते. पण... तिला पप्पा कायमचे सोडून गेले होते... हे त्या क्षणी काही माहित नव्हते...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या