Poll: वाघोलीमध्ये नॅनोचा चक्काचूर; चालक ठार

वाघोली, ता. 8 नोव्हेंबर 2019 : नगरकडे जाणाऱ्या नॅनो मोटारीने दुभाजक ओलांडून पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीला धडक दिल्याने नॅनो मोटारीचा चालक ठार झाला तर इतर दोघे जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 7) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील पुष्कर हॉटेल समोर घडली.

आदित्य दयानंद पाटील ( वय 20, रा वाघोली) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तर दुसऱ्या मोटार मधील नंदू गव्हाणे (वय 30, रा शिरूर) व भाऊ पवार (वय 34, रा. शिरूर) हे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅनो मोटार नगरच्या दिशेने जात होती तर दुसरी मोटार पुण्याकडे जात होती. पुष्कर हॉटेल समोर नॅनो मोटार दुभाजक ओलांडून पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीवर जोरात जाऊन आदळली. यामध्ये नॅनो मधील चालक बाहेर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. उपस्थित नागरिकांनी सर्वांना रुग्णालयात हलविले. पाटील यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जखमी पवार व गव्हाणे यांच्यावर वाघोलीतील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात नॅनो मोटारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे काही काळ पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

कमी उंचीचे दुभाजक ठरतायत जीवघेणे
पुणे-नगर महामार्गावर अत्यंत कमी उंचीचे दुभाजक आहेत. अशा प्रमोटारे या पूर्वीही अपघात झाले आहेत. त्यावरील लाईट कट बँरीकर तुटलेले आहेत. यामुळे विरुद्ध बाजूने येणाऱया वाहनांची लाईट वाहकाच्या डोळ्यावर पडतो. या मुळे रात्रीच्या वेळी दुभाजकाला धडकून अपघात घडतात.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या