Video: करडे येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा

करडे दि ११ नोव्हेंबर २०१९ (प्रतिनिधी): करडे (ता.शिरूर) येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा सोमवारपासून (ता. 11) सुरु झाली.  यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मंगळवारी (ता. १२) पहाटे ५ वाजता भैरवनाथ देवाची महापूजा, दुपारी ११ ते ४ ह भ प गोदावरीताई मुंडे (गंगाखेड) यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते ८ दंडवत आणि शेरणी वाटप कार्यक्रम आणि रात्री ९ वाजता देवाच्या पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्री १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
बुधवारी (ता. १२) सकाळी १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा हजेरीचा कार्यक्रम होणार असून, दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. रात्री १० वाजता वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केष्ट्राचा कार्यक्रम होणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

Image may contain: night and outdoor

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या