वाहनचालकांना पीयूसी बंधनकारक; असा काढा पीयूसी...

शिरूर, ता. 15 नोव्हेंबर 2019: केंद्र सरकारने वाहनचालकांना प्रदूषण नियंत्रण संगणकीकृत प्रमाणपत्र (पीयूसी) बंधनकारक केले आहे. पण, रस्त्यांवर पीयूसी केंद्र दिसत नाहीत ना? कारण सरकारने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण, वाहनचालकांमध्ये संभ्रम आहे. ‘पीयूसी’ नेमकी करायची तरी कुठे अन्‌ कशी?

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे २४ सप्टेंबर २०१९ पासून देशातील पीयूसी यंत्रणा ऑनलाइन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन विभागानेही (आरटीओ) पीयूसी केंद्र चालकांना ऑनलाइन यंत्रणा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे शहरात आतापर्यंत ५० ते ५५ ऑनलाइन पीयूसी केंद्र सुरू झाली आहेत. पण, वाहनचालकांना याबाबत माहिती नाही. सहा महिन्यांपूर्वी वाहनांची पीयूसी करून घेतलेल्या प्रमाणपत्राची मुदत आता संपली आहे. मात्र ऑनलाइन सुविधेबाबत माहिती नसल्यामुळे बहुतांश वाहनचालकांचा विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ऑनलाइन पीयूसीसाठी अशी करा नोंदणी
  • https://parivahan.gov.in या वेबसाइटवर जावे
  • त्यावरील ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ला क्‍लिक करावे.
  • तेथून पुढे येणाऱ्या लिस्टमधून सर्वांत खाली pucc हा पर्याय निवडावा
  • त्यानंतर ‘सिलेक्‍ट’मधून‘पीयूसी सेंटर लिस्ट’वर जावे
  • त्यापुढे राज्य निवडीमध्ये ‘महाराष्ट्र’ पर्याय निवडावा
  • त्यानंतर सिलेक्‍ट ऑफिसमध्ये ‘पुणे’ हा पर्याय निवडून त्यापुढील माहिती भरावी.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या