दिवाळी अंकः पिंपळपान, गावाशी जुळलेली नाळ...

Image may contain: one or more people and textपिंपळे धुमाळ, ता. 15 नोव्हेंबर 2019: पिंपळे धुमाळ गाव म्हणजे शिरूर तालुक्यातील एक रांगडं गाव अन् मिशीवरचा ताव! गावातील अनेक युवक पोलिस दलात अधिकारी पदावर आहेत. गावातील युवक व अधिकाऱयांच्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे दिवाळी अंकाची. विशेष म्हणजे गावासाठी गावातील लोकांनी लिहिलेला दिवाळी अंक आहे.

गावामध्ये दिवाळी अंकाचे जोरदार प्रकाशन झाले. सोशल मीडियावर अंकाची सॉफ्ट कॉपी फिरू लागली. अनेकांजवळ छपाईची प्रत दिसू लागली. अंकामधील वाचनीय लेख अनेकजण वाचताना दिसत आहेत. संबंधित अंक www.shirurtaluka.com ने ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे.

पिंपळपान, गावाशी जुळलेली नाळ; पैलवानांचे गाव ते अधिकाऱयांचे गाव एक संघर्षमय प्रवास.. या अंकाचे प्रकाशक पिंपळे खालसामधील समस्त गावकरी मंडळ आहेत तर रमेश मल्हारी धुमाळ, सचिन संपत धुमाळ हे संपादक आहेत. संबंधित अंक फक्त खाजगी वितरणाकरता आहे. गावाने आगळ्या-वेगळ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करून तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्श निर्माण करून दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या