विद्या विकास मंदिर विद्यालयास सुवर्णपदक

Image may contain: 11 people, people smiling, people standing, child and outdoor
रांजणगाव गणपती,ता.१७ नोव्हेंबर २०१९ (आकाश भोरडे): निमगाव म्हाळूंगी (ता. शिरूर) येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने विभागीय पातळीवर 'डाॅज बाॅल' स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याने त्यांची राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य दिलीप पवार यांनी दिली.

विभागीय पातळीवरील शालेय 'डाॅज बाॅल' स्पर्धा सोलापूर येथील राजीव गांधी स्टेडियमवर नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणाऱ्या निमगाव म्हाळूंगीतील विद्यालयातील मुलींच्या संघाने सोलापूर शहर संघावर बाजी मारून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. २४ नोव्हेंबर रोजी सातारा येथे होणाऱ्या राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.

यामध्ये सानिका रणसिंग (कॅप्टन), रूपाली शिवले, माया शिवले, पायल साळुंके, पूर्वा रणसिंग, अस्मिता वडघुले, साक्षी चव्हाण, ऊर्मिला भोसले व पूजा चव्हाण या खेळाडूंचा समावेश असून, या संघाला पुणे विभागाचे राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. यशस्वी संघाचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पलांडे, प्राचार्य दिलीप पवार, पर्यवेक्षक दादाभाऊ औटी यांनी अभिनंदन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या