Video: वाळू माफियांच्या बोटी स्फोटाने अशा उडवल्या...

Image may contain: sky, cloud, ocean, outdoor and water
शिंदोडी, ता.१७ नोव्हेंबर २०१९ (तेजस फडके): घोड धरणातील दाणेवाडी, पिंपळाचीवाडी, कुऱ्हाडवाडी परिसरात घोडनदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या तब्बल २१ बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडून शिरूर व श्रीगोंदा महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत वाळू माफियांचे तब्बल १ कोटी१० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घोड नदीपात्रातील आजपर्यंतची हि सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे.

निमोणे (ता. शिरूर) येथील पिंपळाचीवाडी, कुऱ्हाडवाडी तसेच दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) हद्दीदीमध्ये घोडनदीच्या पात्रामध्ये गेली काही दिवसांपासून वाळू माफियांनी अवैधपणे वाळू उपसा आणि वाहतुकीचा सपाटा लावला होता. याबाबतचे वृत्त www.shirurtaluka.com ने सातत्याने लावून धरले होत.े नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांच्या कामांमध्ये महसुल तसेच पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने वाळू माफियांनी शासकिय यंत्रणांना आव्हान देत उघडपणे तस्करी सुरु केली होती. या अवैध व्यवसायामध्ये बाहेरच्या काही वाळूमाफियांनी  त स्थानिक पुढारी आणि काही तरुणांना हाताशी धरून ह्या काळया सोन्याची तस्करी चालवली होती.
यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवून कोट्यावधी रुपयांची लुट चालु होती. नदीपात्राचे लचके तोडत, अवजड वाहनांच्या सहाय्याने वाहतूक करताना रस्त्याची ही अक्षरशा चाळण झाली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून या परिसरात अनेक दादा-भाईचा शिरकाव झाल्याने परिसरातील शांततेला ग्रहण लागलेले आहे. रात्री -अपरात्री वाळुवाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने सामान्यांची झोपसुद्धा हराम झालेली आहे. मात्र, दहशतीमुळे कोणीही तोंड उघडत नाही.

शिरूरचे यापूर्वीचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी वेळोवेळी कारवाई करत वाळु माफियांना जेरिस आणले होते. मात्र, बिराजदार यांची बदली होताच वाळू माफियांनी डोके वर काढले होते. निवडणूकीच्या कामातुन उसंत मिळताच परिसरातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत शिरूरच्या तहसिलदार एल.डी. शेख यांच्या पथकाने वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर धडक 'ह्ल्लाबोल' करत तब्बल २१ बोटी जाळून नष्ट केल्या. यामध्ये वाळू चोरांचे तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले. या धडक कारवाईने वाळू माफियांना चांगला 'दणका' दिला आहे.

या पथकामध्ये शिरूरच्या तहसिलदार एल.डी. शेख, बेलवंडी ( ता. श्रीगोंदा ) पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक माने, शिरूरचे मंडलाधिकारी निलेश घोडके, तलाठी सुशिला गायकवाड, ललिता वाघमारे यांसह महसुल कर्मचारी व पोलीस पथकाने भाग घेतला. तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकातील पो.नि. अरविंद माने, पो.स.ई. बोराडे, पो.ना. नंदकुमार पठारे, पो.शि. दादासाहेब क्षीरसागर, पो.शि. संपत गुंड, पो.शि. विकास कारखीले, पो.शि. चालक म्हस्के, कर्जत उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनीही  भेट देऊन पाहणी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या