तळेगाव ढमढेरे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

तळेगाव ढमढेरे, ता: 19 नोव्हेंबर 2019 : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ज्ञानेश्वरनगरमध्ये एका युवकाने घरातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली. युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत दीपक संजय लोखंडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ज्ञानेश्वर नगर) येथील महेश संजय लोखंडे (वय 30) या युवकाने सोमवारी सकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.


महावितरणच्या कर्मचाऱयाला दमदाटी...

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महावितरणच्या सेवेत असलेले विद्युत सहायक महादेव प्रकाश मोरे यांना विद्युत रोहित्राच्या बॉक्‍सची दुरुस्ती करताना तिघांनी धक्काबुक्की, शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध रांजणगाव पोलिसांमध्ये मोरे यांनी तक्रार दिली आहे. महादेव मोरे हे एका हॉटेलजवळील विद्युत रोहित्राच्या बॉक्‍सची दुरुस्ती करीत असताना, हर्षल विलास गदादे व त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी त्यांच्या हॉटेलच्या वीजमीटर थकीत बिलामुळे काढून विद्युतपुरवठा बंद केल्याच्या कारणावरून मोरे यांना धक्काबुक्की, शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करून काम करण्यास मज्जाव केला आहे. मोरे यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी हर्षल गदादे व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या