Video: अन् त्यांची झाली पुन्हा आईशी भेट...

No photo description available.

न्हावरे, ता.२१ नोव्हेंबर २०१९ (प्रतिनिधी): नागरगाव (ता.शिरुर) येथे शेतकरी कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात सापडलेले बिबट्याचे तीन बछडे माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राच्या टीम मुळे आईकडे परत सुखरूप गेले. त्यामुळे बिबट्याच्या मादीपासून होणारा धोका टळला आहे. नागरगाव येथे मंगळवार (दि.१९) रोजी कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम चालू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळले. त्यावेळेस धुमाळ यांनी त्वरित शिरुर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून बिबट्याच्या बछडयांविषयी माहिती दिली.
शिरूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी तातडीने माणिकडोह रेस्क्यू टीमला पाचारण केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख यांनी तीनही बछड्यांना मायक्रोचिप लावून बछडे व मादीची पुन्हा भेट घडवुन आणली. बछडे आढळलेल्या ठिकाणी रेस्क्यू टीमचे सदस्य जीव धोक्यात घालून कॅमेरे लावून ५०० मी अंतरावर बछड्यांच्या आईच्या प्रतीक्षेत बसले होते. सायंकाळी ६.४३ च्या सुमारास एका बछड्याला मादी घेऊन गेली. त्यानंतर अर्ध्या तासातच ७.१५ वाजता मादी परत आली आणि दोन्ही बछडयांना घेऊन गेली.

त्या ३ बछड्यांमध्ये १नर व २ मादी होत्या. बछडे परत मिळाल्यामुळे मादी चिडून हल्ले करणार नाही असे डॉ.देशमुख यांनी सांगितले.या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये वाईल्ड लाईफ SOS चे आकाश डोळस, वैभव नेहरकर, वनविभागाचे प्रवीण क्षीरसागर, भानुदास शिंदे या कर्मचार्यासह शिरूर गावकरी रेस्क्यू टीमचे सुधीर चितळे, शरद गदाबे, सुनील कळसकर, गोविंद शेलार व गावकरांनी मोलाचे सहकार्य केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या