शिरूर महसूल खात्याने केली सर्वांत मोठी कारवाई...

शिरूर, 22 नोव्हेंबर 2019 (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे स्वतःच्या मालकीचा परंतु बेकायदशिररित्या डोंगर उत्खननप्रकरणी किशोर मगर, कृष्णा मगर आणि रामा मगर यांना तब्बल पाच कोटी तीस लाख तीस हजार सातशे रुपयाचा दंड वसूलीची नोटिस शिरूर महसूल खात्याने दिली आहे.

शासनाची नजर चुकवून तसेच कोणतीही परवानगी न घेता व रॉयल्टी न भरता सुमारे ६०,००० ब्रास मुरूम विकला असून, डोंगर पोखरून मोठी कमाई केलेल्या मगर बंधूना यामुळे मोठा भुर्दंड बसला आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम व अधिकाराचे सर्व नियम पायदळी तुडवून, दोन नंबर करून मोठी माया गोळा करून समाजात आपली दहशत निर्माण करणाऱ्या इतर धेंड्यांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.

अलीकडच्या काळातील महसूल खात्याची सर्वात मोठी कारवाई असून तालुक्यात याची चर्चा होत आहे. महसूल खात्याने दिसून आंधळी भूमिका घेतल्यामुळे या प्रकरणात एका सामान्य नागरिकाने धोका पत्करून ही कारवाई करण्यास संबंधित खात्याला भाग पडले. 'www.shirurtaluka.com'ने या प्रकरणात वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे कारवाईसाठी लांबलेले हे प्रकरण तात्काळ निकाली निघाले.

शिरूरचे निवासी नायब तहसीलदार यांनी श्री. व्हट्टे यांनी आपली कर्तव्यतत्परता दाखविल्यामुळे कारवाईला गती मिळाली. संबंधित प्रकरणाची व्याप्ती मोठी असलेमुळे 'ईटीएस' मशीनद्वारे मोज-मापे घेऊन दंड निश्चित करण्यात आला. एरवी भरारी पथके नियुक्त करून वाळू, मुरूम यांच्यावर कारवाई करणारे महसूल खात्याला पोखरलेले डोंगर दिसले नाहीत का? दिसले असेल तर कारवाई का केली नाही? स्वतःचा जीव धोक्यात घालून सामान्य नागरिकांनी पुढे येऊन असे काम केल्यामुळे त्याचे कौतुक व शाबासकी मिळणार का? असे असंख्य प्रश्न या कारवाईनिमत्त समोर आले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या