वाळू चोरांवर केली पहाटे कारवाई; ट्रक ताब्यात

Image may contain: one or more people, people standing and outdoor
शिरूर, ता. 27 नोव्हेंबर 2019:
शिरूर महसूल विभागाच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारे चार ट्रक ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती तहसीलदार लैला शेख यांनी दिली.

शिरूर तालुक्‍यातील अद्याप एकाही वाळू भूखंडाचा लिलाव झाला नाही, तरीही मागील काही दिवसांपासून वाळूचोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत महसूल खात्याने वारंवार कारवाई करण्याचा प्रयत्न केला. पण वाळूचोर पसार व्हायचे. यावर तहसीलदार शेख यांनी वाळू वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यावर पथके नेमायची व कारवाई करून पायबंद घालायचा निर्णय घेतला. त्यानुसार, तहसीलदार शेख यांनी मंडलाधिकारी व तलाठी यांच्यासहित पुणे-नगर रस्त्यावर सापळा लावला होता. रांजणगाव गणपती व शिक्रापूर दरम्यान मंगळवारी पहाटे चार ट्रक पथकाने ताब्यात घेतले. ट्रक तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे येथील सरकारी गोदामामध्ये लावण्यात आले.

बेकायदा वाळू वाहूतकप्रकरणी www.shirurtaluka.com ने सातत्याने वृत्त दिले आहे. बेकायदा वाळू वाहतूकीमुळे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून, रस्त्यांचीही चाळण झाली आहे. नागरिक सातत्याने कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, ट्रक मालकांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल, त्याशिवाय गाड्या सोडल्या जाणार नाहीत, अशी माहिती तहसीलदार शेख यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या