किरण ऊर्फ बंटी ढोकले यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार

Image may contain: 6 people, people smiling, people standing
शिरूर, ता. 29 नोव्हेंबर 2019: करंदी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते किरण तथा बंटी ढोकले यांना 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण' पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने "यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार" पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणाऱ्या युवकाला हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात येतो. करंदी (ता. शिरूर) येथील युवक किरण ऊर्फ बंटी ढोकले यांना हा यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राळेगणसिद्धी येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या वतीने यशवंत वेणू गौरव सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश प्रभुणे होते तर यशवंत वेणू हा पुरस्कार संत गाडगेबाबा अभियानाचे प्रणेते चंद्रकांत दळवी व पद्माताई दळवी यांना देण्यात आला.

दरम्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गिरिष प्रभुणे, एम.जे.एल. लाफा, ओमप्रकाश पेठे, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, राजेंद्र वाघ त्याचबरोबर कार्यक्रमासाठी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल, शिरूर कृषी उत्पन्न माजी सभापती प्रकाश पवार, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर जांभळकर, तसेच करंदी गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले तर आभार मुरलीधर साठे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या