वाघाळे येथे वीजेसाठी उपोषण; अधिकारी म्हणतात...

Image may contain: 5 people, people standing and outdoorवाघाळे, ता. 3 डिसेंबर 2019: रात्रीच्या वेळी बिबट्या अन्‌ शेतात पाणी देताना विषारी साप चावण्याची भीती वाटत असल्यामुळे शेतकरय़ांना दिवसा वीज द्यावी, या मागणीसाठी गावचे माजी सरपंच पप्पू उर्फ तुकाराम भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी सोमवारपासून (ता. 2) उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला परिसरातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

रात्रीच्या वेळी बिबट्या अन्‌ शेतात पाणी देताना विषारी साप चावण्याची भीती वाटते. त्यात यंदा पाणी असून रात्रीची वीज असल्याने शेतात पाणी देता येत नाही. अधिकाऱ्यांकडे तक्रार करून थकलो. पण दिवसा वीज मिळत नाही. अखेर उपोषण करायची वेळ आली, अशी खंत वाघाळे ( ता. शिरूर ) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अधिकाऱयांनी दखल न घेतल्यास परिसरातील शेतकरी तीव्र आंदोलन करणार आहेत.

शिरूर तालुक्‍यातील महावितरण कंपनीच्या विरोधात वाघाळे येथे पप्पू भोसले हे उपोषणास बसले आहेत. बिबट्या व विषारी सापांमुळे शेतकऱ्यांना शेतात रात्रीचे पाणी देता येत नाही. महावितरण शेताला लागणारी थ्री फेज वीज दिली जात नाही. या भागाला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 27) संबधित महावितरण कार्यालयाकडे केली होती. याबाबत तक्रार करूनही कोणतीच कारवाही झाली नाही. संबंधित अधिकारी या भागात फिरकलेच नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी माजी सरपंच तुकाराम भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले आहे. या वेळी सरपंच अमोल धरणे, उपसरपंच दिलीप थोरात, ओंकार थोरात, रामदास गायकवाड, कोंडिबा बढे, राजेंद्र भोसले, उत्तम भोसले, दत्तात्रय ढेरंगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, बुरुजवाडी परिसरात रात्रीच्या वेळी बिबटे फिरताना अनेकांनी पाहिले असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे शेतकऱयांमुळे घबराट आहे.

महावितरणचे अधिकारी म्हणतात...
वीजेच्या मागणीसाठी तुम्ही चार-पाच दिवस उपोषणाला बसा, त्यानंतर वरिष्ठ अधिकारी दखल घेतील. त्याशिवाय वीज मिळणार नाही, असे महावितरणचेच अधिकारी म्हणत असल्यामुळे एक प्रकारे उपोषण करण्यास ते सांगत असल्याचे जाणवत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या