Hyderabad Rape Case : आरोपींचा एन्काऊंटर

Image may contain: 4 people
हैदराबाद, ता 6 डिसेंबर 2019 : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी आज (शुक्रवार) एन्काऊंटर केला. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चारही जणांचा खात्मा केला.

चारही आरोपी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत होते. 4 डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असं चारही आरोपींची नावं आहेत.

Image may contain: one or more people, people standing, outdoor and natureहैदराबाद शहराबाहेर असलेल्या शमशाबादमध्ये 27 नोव्हेंबरच्या चार ट्रक चालक आणि क्लीनरने महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पेट्रोल टाकून तिला जाळून मारलं होत. या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात आंदोलनं होतं होती.

प्रकरणाचा तपास आणि पुरावे मिळवण्यासाठी पोलिस घटनास्थळी जाऊन 'ती घटना कशी घडली' यासाठी घटनेचं रिकंस्ट्रक्शन करतात. घटनास्थळी आरोपींनाही नेलं जातं, जेणेकरुन ते आपल्या कृत्याच्या पाढा वाचतील. पोलिस हे यासाठी करतात जेणेकरुन त्यांच्याकडून खटला आणखी मजबूत होईल आणि कोर्टात प्रकरणाशी संबंधित सर्व पैलू मांडू शकतील.

Image may contain: one or more people, outdoor and nature"आम्ही सरकार आणि पोलिसांचे आभारी आहोत. आज आम्हाला न्याय मिळाला आहे. आज जे झालं ते गुन्हेगारांसाठी एक उदाहरण आहे," अशी प्रतिक्रिया बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या बहिणीने दिली आहे. तर "आम्हाला 10 दिवसांनंतर अखेर न्याय मिळाला. आज आमच्या लेकीला न्याय मिळाला आहे," अशा शब्दात तिच्या वडिलांनी भावनांना वाट मोकळी केली.

पोलिसांनी खूप चांगलं काम केलं आहे. या वृत्तामुळे मी फारच आनंदी आहे. माझ्या आत्म्याला समाधान मिळालं आहे. या आरोपींसोबत असंच व्हायला हवं, अशी शब्दात निर्भायाची आई आशा देवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या