पाकिटात तब्बल चार हजार रुपयांसह 'या' वस्तू होत्या, पण...

Image may contain: 13 people, people smiling, people standing
देवदैठण,ता.१० डिसेंबर २०१९ (प्रतिनिधी): समाजामध्ये अजुनही प्रामाणिक पणा शिल्लक आहे याचे उत्तम उदाहरण नुकतेच श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे आसिफ फिरोज मन्यार यांच्यामध्ये पाहायला मिळाला.

देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील शिक्षक राजेंद्र किसनराव जगताप (रा . कारेगाव) हे शाळा सुटल्यानंतर कारेगाव येथे आपल्या दुचाकीवर निघाले होते. शाळेपासून काही अंतरावर त्यांच्या खिशातील पैशाचे पाकीट पडले. काही वेळाने आसिफ मन्यार हा तरूण तेथून जात असताना पाकीट पडलेले दिसले.त्यात तब्बल चार हजार रुपयांसह एटीएम कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड अशी महत्वाची कागदपत्रे होती.

आसिफ यांनी पाकीट सापडल्यानंतर मनात कोणताच अविचार न आणता जगताप यांना संपर्क केला व मला तुमचे पाकीट सापडले आहे असे प्रामाणिकपणे सांगितले.आपले पाकीट हरवले आहे याची तोपर्यंत जगताप यांना कल्पना नव्हती. त्यांनी माघारी येऊन पाकीट ताब्यात घेतले तर सर्व पैसे व कागदपत्रे सुरक्षित होती .त्यांनी आसिफ यांचे तोंडभरून कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.

आसिफ हे रांजणगाव एमआयडीसी मधील आयटीसी आयटीडी  या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणा बदल विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी शेळके, प्रमोद रूपनर, पर्यवेक्षक संपत गाडेकर, संदीप वेताळ, निवृत्ती वेताळ, प्रदीप पारधी, माच्छिंद्र बनकर, सतीश कौठाळे, गोरख कौठाळे, प्रशांत वाळुंज, अमोल कातोरे, संजय पारखे, लक्ष्मण अहिरे, शंकर गाडीलकर, सचिन पवार व सर्व शिक्षकांनी आसिफ मन्यार यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक करून सन्मान केला. तसेच बक्षीसही दिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या