Poll: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पंसती कोणाला?

शिरूर, ता. 17 डिसेंबर 2019 : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास, पुणे जिल्ह्यात या तीनही पक्षांचा प्रत्येकी किमान एक मंत्री असणार आहे.

राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे (काँग्रेस) यांची नावे चर्चेत आहेत. पुणे शहर व जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नसल्याने, पक्षवाढीसाठी एक मंत्री देण्याचे सेनेचे धोरण असणार आहे. यासाठी पुन्हा विजय शिवतारेंना संधी मिळणार की, ऐनवेळी शिवाजीराव आढळरावांना संधी मिळणार, याचीच चर्चा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये रंगू लागली आहे. दरम्यान, पाच वर्षाच्या खंडानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने पालकमंत्री संदर्भात मतचाचणी घेतली असून, नेटिझन्स आपला कौल नोंदवताना दिसत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाल्यानंतर त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर सलग १५ म्हणजेच २०१४ पर्यंत आघाडी सरकार सत्तेत होते. या पंधरा वर्षातील तीन महिन्यांचा अल्प काळ उर्वरीत सर्व काळ अजित पवार हे पालकमंत्री होते. भाषणातील एका असंसदीय शब्दामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या या राजीनामा कालावधीत मुंबईचे सचिन अहिर हे पुण्याचे पालकमंत्री झाले होते. आघाडीचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सत्तांतर झाले आणि सत्तांतरानंतर भाजपचे गिरीश बापट जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.

पुणे जिल्ह्यात शहर, जिल्ह्यात काँग्रेसचे दोनच आमदार आहेत. त्यात भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप यांचा समावेश आहे. जगताप हे पहिल्यांदाच निवडून आले असून थोपटे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार थोपटे यांचे नाव अग्रक्रमाने राहणार आहे. माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे थोपटे यांचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर झाला आहे

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या