शिरूरच्या 45 जणांना 'या' भागात फिरता येणार नाही...

शिक्रापूर, ता. 18 डिसेंबर 2019: पेरणे फाटा (ता. शिरूर) येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त खबरदारी म्हणून शिक्रापूर पोलिस स्टेशनकडून 45 जणांना मनाई हुकूम काढला आहे.

अभिवादन दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्रापूर पोलिसांनी हद्दीतील सर्व गावांमधून समाजविघातक प्रवृत्ती असणाऱ्या एकूण 45 जणांची यादी तयार केली आहे. यात काही राजकीय पक्षांशी, काही सामाजिक संघटनांशी; तर काही स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या 45 जणांमध्ये औद्योगिक क्षेत्रात गंभीर गुन्हे दाखल असलेले, शस्त्रास्त्र आढळलेले, सामाजिक संघटनांच्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा समावेश केला आहे. तसेच, गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन माजी उपसरपंचांसह पाच महिलांचा समावेश आहे. त्यांना 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, कोंढापुरी व पेरणे या भागांमध्ये फिरता येणार नाही. या कारवाईची व्याप्ती आणि यादीतील व्यक्तींची संख्या आणखीही वाढणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच, कोरेगाव भीमा दंगलीशी संबंधित राज्यातील अनेक जणांची स्वतंत्र यादीही पोलिस मुख्यालयाला देण्यात आल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या