बारामती येथे डाॅ.श्रीराम लागू यांना आदरांजली

Image may contain: 13 people, people smiling, people standing
बारामती,ता.१९ डिसेंबर २०१९ (प्रतिनिधी ): जेष्ठ अभिनेते,विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डाॅ.श्रीराम लागू यांच पुण्यात दि.१७ डिसेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.डाॅ.लागू यांच्या जाण्याने कलाविश्वातील एक कसलेला अभिनेता,प्रेक्षकांचा हक्काचा ‘नटसम्राट’ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्यावतीने डाॅ.श्रीराम लागू यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.प्राचार्य रा.बा.देशमुख यांच्या हस्ते डाॅ. श्रीराम लागू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.अभिवादन प्रसंगी डाॅ.डी.ए.मोरे,प्रा.सिद्धार्थ तायडे,प्रा.पी.व्ही.जाधव,डाॅ.आर.जे.मराठे,प्रा.जे. आर.घोडके,डाॅ.राम मोरे,प्रा.आकाश वाघमारे,प्रा.ए.के.पाटील,प्रा.शिंदे,प्रा.ढवाण,डाॅ.फाटके यांच्यासह नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

नाट्यशास्त्र विभागाचे प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी डाॅ.लागू यांच्या रंगभूमीवरील कार्याला उजाळा दिला.नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थी कलावंत आकाश वाघमारे,जयदिप नागवडे,महेश मांडगे,नेहा ठाकूर,धनश्री रणदिवे,सुरज रणदिवे यांनी नाट्यस्वगत सादर करुन डाॅ. लागू यांना नाट्यांजली अर्पण केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या