बिबट्या पिंजऱयात एकटाच 'एवढा' वेळ बसून होता...

No photo description available.न्हावरे, ता. 20 डिसेंबर 2019 : न्हावरे-आंबळे-निमोणे या गावांच्या सीमेवर वनखात्याने पिंजरा लावला होता. त्यामध्ये बिबट्याही अडकला, पण याबद्दलची माहिती वनखात्याला नव्हतीच. माहिती समजल्यानंतर अखेर त्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले.

शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये बिबट्याला नागरिकांनी पाहिले आहे. न्हावरे-आंबळे-निमोणे या गावांच्या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. न्हावऱ्यातील एक शेतकऱ्याची कालवड बिबट्याने फक्त केली होती. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने सोमवारी (ता. 16) निमोणे परिसरातील शेतकरी पांडुरंग दुर्गे यांच्या शेतात पिंजरा लावला.

गुरुवारी मध्यरात्री बिबट्या भक्ष्याच्या शोधात फिरत असताना या पिंजऱ्यात तो जेरबंद झाला. मात्र, याबाबत तब्बल 14 ते 16 तास वन विभागाला माहितीच समजली नाही. अखेर त्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या