Video : आंधळगाव येथे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

न्हावरे, ता. २० डिसेंबर २०१९ (वार्ताहर): आंधळगाव (ता.शिरूर) येथे मध्यराञी ११ च्या वेळी अज्ञात व्यक्तीने तब्बल अर्धा एकर क्षेञावरील टोमॕटोची झाडे उपटून टाकल्याने संबंधित शेतकऱ्याचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत स्वप्निल आण्णा खरात (रा.आंधळगाव,ता.शिरूर ) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन अज्ञात व्यक्तीकडून तब्बल अर्धा एकर टोमॕटो उपटल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यामध्ये स्वप्निल खरात यांचे तब्बल दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सध्या खरात यांचा टोमॕटोला प्रतिकिलो २० रुपये बाजारभाव मिळत होता.परंतु टोमॕटोची झाडे उपटल्यामुळे त्यांनी केलेला सर्व खर्च वाया गेलेला आहे. टोमॕटो उपटल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यापुढे शेती करावी कि नाही असा प्रश्न या शेतकऱ्यांला पडला आहे.स्वप्निल खरात हे आपल्या कुटूंबियासोबत आंधळगाव येथे शेतीचा व्यवसाय करतात.गेले अनेक वर्ष ते टोमॕटोचे चांगल्या प्रकारचे उत्पादन घेत आहेत. परंतु कोणत्या तरी समाजकंटकांनी सुमारे अर्धा एकर टोमॕटोची झाडे उपटुन टाकल्याने आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या