खासदारांनी टाकलेल्या पत्रातील मजकूर आहे तरी काय?

Image may contain: 1 person, closeupशिरूर, ता. 21 डिसेंबर 2019: खासदारांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पत्रातील मजकूर वाचता येत नाही. पण, ही पत्रे सोशल मीडियावर टाकण्याचा उद्योग गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू आहे, अशी टीका शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवनेरीवर शिवसृष्टी, रोप वे, वढू-तुळापूरला शंभुसृष्टी आणि आणि इतर विषयांवर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची एक वर्षापूर्वीची पत्रे माझ्याकडे आहेत. तशीच पत्रे त्यांनी मिळवली असून, तीच सोशल मीडियावर टाकण्याचा गेले आठ-दहा दिवस उद्योग चालू आहे. मात्र, त्यांनी टाकलेल्या पत्रातील मजकूर देखील वाचता येत नाही. एप्रिल 2018 ला याबाबत तत्कालीन सांस्कृतिक मंत्री व संबंधित खात्याने मला पत्र दिली आहेत. जे विषय सरकारच्या विचाराधीन आहेत, काही कामांना मंजुरी मिळालेली आहे, अर्थसंकल्पात तरतूद झाली आहे, त्यांचीच मागणी करून खासदारांनी काय साध्य केले हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे, असे आढळराव पाटील म्हणाले.

आढळराव पाटील पुढे म्हणाले, 'राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे पक्ष राज्यातील सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत आले असले; तरी ही महाविकास आघाडी अद्याप आमच्या पचनी पडलेली नाही. आघाडीचा समन्वय खालच्या पातळीवरील शिवसैनिकांपर्यंत पोचला नसल्याने कार्यकर्ते याबाबत अनभिज्ञ आहेत. राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला असला; तरी आगामी काळातील स्थानिक पातळीवरील निवडणुकांबाबत याबाबत कुठलेही धोरण ठरलेले नाही. लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आंबेगाव, खेड व जुन्नर या जागांवर पराभव पत्करावा लागल्याने गांभीर्याने आत्मपरीक्षण केले जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाप्रमाणे यापुढील निवडणुकांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत कुठलेही धोरण ठरलेले नसल्याने आम्ही स्वतंत्ररीत्या निवडणुकांची तयारी व पक्षसंघटन मजबुतीचा ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे व ग्रामीण भागात तो प्रभावीपणे राबवीत आहोत.''

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाचे मूल्यमापन जनतेनेच करावे. मी यापूर्वी मांडलेले मुद्दे मांडून ते संसदेचा वेळ घेत आहेत, अशी टीपणी आढळराव पाटील यांनी केली. ते म्हणाले, ""शिवनेरीवर शिवसृष्टी, रोप वे, वढू-तुळापूरला शंभुसृष्टी आणि आणि इतर विषयांवर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची एक वर्षापूर्वीची पत्रे माझ्याकडे आहेत. तशीच पत्रे त्यांनी मिळवली असून, तीच सोशल मीडियावर टाकण्याचा गेले आठ-दहा दिवस उद्योग चालू आहे. मात्र, त्यांनी टाकलेल्या पत्रातील मजकूर देखील वाचता येत नाही. एप्रिल 2018 ला याबाबत तत्कालीन सांस्कृतिक मंत्री व संबंधित खात्याने मला पत्र दिली आहेत. जे विषय सरकारच्या विचाराधीन आहेत, काही कामांना मंजुरी मिळालेली आहे, अर्थसंकल्पात तरतूद झाली आहे, त्यांचीच मागणी करून खासदारांनी काय साध्य केले हे त्यांचे त्यांनाच माहीत.''

पुणे जिल्ह्यात एकही आमदार नसल्याने शिवसेनेला मंत्रिपद मिळणार नसले; तरी मुख्यमंत्री आमचा असल्याने आम्हाला मंत्रिपदाची गरज नाही. मंत्रिपदापेक्षा पक्ष आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित योजनांना व विकासकामांना चालना दिली जाईल, असेही  आढळराव पाटील म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या