एस टी स्थानकात बॉम्बशोध पथक,पोलिसांचे मॉकड्रील

Image may contain: 7 people, people standing
शिक्रापूर,ता.२५ डिसेंबर २०१९(प्रतिनिधी): शिक्रापूर (ता.शिरुर) येथील एसटी स्थानकात बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यांनतर काही वेळातच त्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करीत बॉम्बशोध व बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने बॉम्ब निकामी केला.मात्र, ही वस्तू इलेक्‍ट्रिक वस्तू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

शिक्रापूर एस टी स्थानकात संशयित वस्तू अथवा बॉम्ब असल्याचा फोन पोलीस स्टेशनमध्‌ये आला.त्यांनतर तातडीने सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस नाईक अमित देशमुख,अशोक वणवे, प्रताप कांबळे,अशोक केदार यांनी त्याठिकाणी धाव घेतली आणि परिसरात नाकाबंदी केली.

काही वेळातच पुणे ग्रामीण बॉम्ब शोध व बाँम्ब नाशक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे,पोलीस नाईक रणजीत कोंडके,चंद्रशेखर मगर, भाऊसाहेब पुंड,रमेश भोसले,राहुल वाघमोडे,कुणाल सरडे,महेश जाधव हे पुणे ग्रामीण पथकाचे श्‍वान मॉंटीसह त्याठिकाणी दाखल झाले.पथकाने त्यांच्याजवळील यंत्र सामग्रीच्या सहाय्याने एसटी स्थानकात असलेल्या संशयित वस्तूंची तपासणी केली.ती संशयित इलक्‍ट्रिक वस्तू असल्याचे निदर्शनास आले.

पथकाने शिताफीने ही वस्तू निकामी करून घेतली.यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट व बॉम्ब शोध व बॉम्बनाशक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी नागरिकांना माहिती दिली.तसेच परिसरात कोठेही संशयित वस्तू आढळून आल्यास त्याला स्पर्श न करता पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या