शिरुरला राष्ट्रीय ग्राहक सप्ताह उत्साहात

Image may contain: 14 people, people standing
शिरुर,दि. २७ डिसेंबर २०१९ (संपत कारकूड ): येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमीत्त ग्राहक पंचायत शिरुर व अन्न  पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक सप्ताह समारोप उत्साहात पार पडला.

तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला एक ग्राहक म्हणून जर आपले अधिकार माहित झाले तर पिळवणूक थांबेल.सामान्य नागरिकांमध्ये अधिकाराची जाणीव व जनजागृती झाल्यास प्रशासन सुधारेल हेच काम राष्ट्रीय ग्राहक दिनानिमीत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे शिरूर येथील ग्राहक दिनानिमीत्त समोर आले आहे. तालुक्याचा एकाच  ठिकाणी ग्राहक आणि सेवक एकत्र आल्यास काही अंशी समस्या सुटतील.अनेक वर्ष प्रशासनाच्या पायऱ्या झिजवुनही काम होत नाही.प्रशासनाच्या प्रत्येक विभागात चहापाणी दिल्याशिवाय कामच होत नाही.हि सध्याची वस्तुस्तिथी आहे.ती समूळ उखडून काढण्यासाठी ग्राहक दिनानिमत्त जास्तीत जास्त जनजागृती चळवळ वाढविण्याची गरज असल्याचे येथे आलेल्या ग्राहकांचे म्हणणे आहे.

या कार्यक्रमात तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग,कृषी विभाग,सब रजिस्टर,आरोग्य विभाग,वन खाते,पोलीस प्रशासन यांनी नागरिकांच्या थेट समस्यांचे समोरासमोर निराकरण करण्याचं प्रयत्न केला.तहसीलदार एल डी शेख यांच्या हस्ते उदघाटन झाले.पुरवठा विभाग प्रमुख स्वाती शिंदे,ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अशोक भोरडे,पत्रकार अरुणकुमार मोटे,सामाजिक कार्यकर्ते उद्धव जाधव,प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद जाधव,दत्ता तरटे आदी कार्यकर्ते व ग्राहक नागरिक उपस्थित होते. 


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या