तळेगाव ढमढेरे येथील "वेळ" नदी झालीये गटारगंगा

तळेगाव ढमढेरे,ता.२७ डिसेंबर २०१९ (जालिंदर आदक): एकीकडे केंद्र सरकार नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे.परंतु काही ठिकाणी नागरिक नदीच्या पाण्यात सांडपाणी आणि दुषित पाण्याबरोबर कचरा टाकत आहेत.त्यामुळे जीवनदायिनी असलेल्या अनेक नद्या आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत.पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यातही नद्यांची गटारगंगा झाली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील "वेळ" नदीत सध्या सांडपाणी आणि कचरा टाकल्यामुळे "वेळ" नदीची गटारगंगा होत आहे.नदीचे पाणी दुषित झाल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.परंतु नदीमध्ये दुषित पाणी नक्की कोण सोडतय याचा शोध घेण्याची गरज आहे.तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथुन वेळ नदी वाहते.शेतकरी या नदीचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी वापरतात.परंतु वाढत्या शहरीकरणामुळे नदीमध्ये सांडपाणी आणि कचरा टाकला जात असल्यामुळे नदीचे पाणी प्रदुषित  होऊन दुर्गंधी पसरली असुन त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.प्रदुषित पाण्यामुळे डासांची निर्मिती झाली असल्याने अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

"वेळ" नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी हे दुषित पाणी कसे वापरायचे हे कोडे पडले आहे.नुकताच पावसाळा संपल्यामुळे शेतकर्यांना पाण्याची कमतरता भासत आहे.तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायने कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी २३ मे २०१९ रोजी  ग्रामपंचायत निधीतून ५.५० लाख रुपये किमतीची घंटागाडी खरेदी केलेली आहे.या ओझोन घंटा गाडीच्या माध्यमातून गावठाण परिसरात जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी उपयोग केला जाणार होता.परंतु आजही परीस्थिती बदललेली नाही.अजुनही कचरा नदी किनारी टाकला जात आहे.

यावेळी बोलताना तळेगाव ढमढेरे येथील ग्रामविकास अधिकारी संजय खेडेकर म्हणाले "वेळ" नदीला साचलेला कचरा आणि दुषित पाणी याची प्रत्यक्ष पाहणी करुन दोन कर्मचार्‍यांना पाठवून लवकरच साफसफाई केली जाईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या