रस्त्यांची लागलीये वाट पण वाळु माफिया मात्र मोकाट

Image may contain: plant, tree, sky, outdoor and nature
शिंदोडी,ता.२८ डिसेंबर २०१९ (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या घोड धरणात सध्या अवैधरीत्या बेसुमार वाळु उपसा चालु आहे.गेल्या ६ महिन्यांपासुन पिंपळाचीवाडी,कुऱ्हाडवाडी येथे घोड धरणाच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात यांत्रिक बोटींच्या साह्याने रात्रंदिवस अवैधरीत्या वाळु उपसा चालु होता.पिंपळाचीवाडी तसेच कुऱ्हाडवाडी येथील वाळुची शिंदोडी-निमोणे रस्त्याने वाहतुक करण्यात येत होती.त्यामुळे हा रस्ता जागोजागी उखडला असुन अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत.अनेकवेळा या खड्यांमुळे दुचाकी वाहनचालकांचे गंभीर अपघातही झाले आहेत.त्यामुळे आता हे खड्डे नक्की कोण बुजवणार...? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

महसुल विभागाने वेळोवेळी कारवाई करत अनेक वाळु उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली होती.त्यामुळे वाळु उपसा करण्याचं प्रमाण कमी झाल आहे.परंतु पुर्णपणे वाळूचा उपसा थांबलेला नाही.अजुनही शिंदोडी येथे अवैध वाळु उपसा चालू आहे.त्यामुळे अजुनही शिंदोडी-निमोणे रस्त्यावर बेकायदेशीर वाळु वाहतुक चालू आहे.काही दिवसांपुर्वी शिंदोडी,कुऱ्हाडवाडी येथील वाळु माफियांवर मोठी कारवाई करत महसुल खात्याने दंड ठोठावला होता आणि संबंधित वाळु माफियांना नोटीसा काढल्या होत्या.परंतु तो दंड वसुल केला का नाही...? हे मात्र अजुनही गुलदस्त्यातच आहे.हा दंड वसुल न करण्यासाठी महसुल खात्याकडुन तोडपाणी करुन वाळुमाफियांचा दंड माफ करण्यात आल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

अवैध वाळु उपश्याबाबत "शिरुर तालुका डॉट कॉम" ने वेळोवेळी सडेतोड भुमिका घेत निर्भिडपणे वृत्त प्रसिध्द केले आहे.त्यानंतर महसुल खात्याने वेळोवेळी वाळु माफियांवर कारवाई केलेली आहे.परंतु अजुनही बेकादेशीररीत्या वाळु उपसा चालु असल्याने शिंदोडी येथील RTI कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली असुन शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असताना महसूल खाते दुर्लक्ष का करतंय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या