Video: बेदम मारहाण करूनही अजामीनपात्र गुन्हा?

मांडवगण फराटा, ता. ३ जानेवारी २०२० (संपत कारकूड) : मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथे टॅक्टरमधून जनावरांसाठी ऊस घेऊन जात असताना पाठीमागुन येणाऱ्या टेम्पो मधील दोघांनी पुढे येऊन,साईड का दिली नाही असा जाब विचारून बेदम मारहाण करण्याचा प्रकार मांडवगण फराटा येथील इनामदार वस्ती पुलाजवळ घडला आहे.परंतु बेदम मारहाण करुनही पोलिसांनी मारहाण करणाऱ्यावर राजकीय दबावापोटी अजामीनपात्र गुन्हा नोंदवला गेल्याची परिसरात चर्चा आहे.


इनामगाव(ता.शिरुर) येथील गांधले मळा येथे राहणाऱ्या ऋषिकेश कल्याण घाडगे आणि त्याचा भाऊ सौरभ बंडू घाडगे उसाचा ट्रॅक्टर घेऊन आपल्या घरी जात असताना ट्रॅक्टरमध्ये लोड असल्यामुळे मागच्या टेम्पोला लगेच साईड देता आली नाही.त्यामुळे स्थानिक रहिवाशी असलेले टेम्पो घेऊन जाणारे किरण फक्कड फराटे,मंगेश बाबासाहेब फराटे,सागर फराटे आणि इतर एकाने वरील घाडगे बंधूनां लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.मांडवगण फराटा पोलीस चौकीला गु.र.नों ३२३, ३५२, ५०४, ५०६, ४३ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

बेशुद्ध पडेपर्यंत एकाला मारहाण तर दुसऱ्याला दगड फेकून गळ्याला जखम झाल्यावरही पोलिसांकडून फक्त राजकीय दबावापोटी अजामीनपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप घाडगे बंधुंच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या