शिरुर भूमी अभिलेखच्या चुकीमुळे नागरिकांना मनस्ताप

शिरुर, ता. २ जानेवारी २०२० (संपत कारकूड) : आजही भूमी अभिलेख या विभागा संबंधी सामान्य नागरिकांना फारच कमी माहिती आहे.भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नकाशे, मिळकतीची कागदपत्रे, जमीन मोजणी याची कामे होतात यापलीकडे बहुंतांश नागरिकांना काहीच माहित नाही. नागरिकांच्या याच अज्ञानपणाचा फायदा घेऊन ग्रामीण भागात सन १९९० मध्ये घेण्यात आलेल्या सिटी सर्व्हेमध्ये अनेक गंभीर चुका झालेल्या आहेत.

चूक भूमी अभिलेख विभागाची आणि मनस्ताप मात्र नागरिकांना होतोय अशी वस्तुस्थिती सध्या या खात्यामध्ये दिसून येत आहे.कागदपत्रे दुरुस्तीसाठी व तक्रारीसाठी हेलपाटे मारून मनस्तापाला सामोरे जाऊन नागरिक किती दिवस भुर्दंड सोसणार हाच खरा प्रश्न आहे.जमीन एकत्रीकरण व सन १९९० मध्ये घेण्यात आलेल्या सिटी सर्व्हेमध्ये ग्रामीण भागात गावठाण हद्दीतील जागेचा तर काही ठिकाणी ग्रामपंचायत मालकीच्या मोक्याचा ठिकाणच्या मोकळ्या जागा तात्कालीन सर्व्हअरला हाताशी धरून स्वतःच्या नावावर करून घेण्याचा पराक्रम शिरूर तालुका भूमी अभिलेखमध्ये उघड झाला आहे.

अत्यंत बेपर्वाईने व माहित असतानाही दिसेल त्या मोकळ्या व बक्खळ जागा तसेच मुळजागा करून राहणाऱ्यांच्या मालकी हक्काच्या नावावर तीन वेगवेगळे सिटी सर्व्हे क्रमांक करून नकाशात बसविण्यात आल्या आहेत. हा पराक्रम शिरूर भूमी अभिलेखमध्ये घडला आहे.कोणताही सक्षम पुरावा न पाहता केवळ तोंडी जबाब घेऊन झालेला सिटीसर्व्हे मुलतः सदोष आहे.तो विना खर्ची दुरुस्त करावा,नागरिकांना योग्य पुरावा घेऊन विनासायास दुरुस्त करावा,अशी मागणी दुरुस्ती अपीलकर्त्यानी शासनाकडे केली आहे. 
क्रमशः   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या