सावित्रीबाईंचे विचार जीवनाला दिशादर्शक:सुधीर मुळे

Image may contain: 12 people, people smiling, people standing and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता. ८ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): सावित्रीबाईंचे विचार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन ए.एस.एन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक सुधीर मुळे यांनी केले.

कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गो.गायकवाड विद्यालयात 'स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले'या विषयावर मुळे बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की'चूल आणि मूल'ही संकल्पना सावित्रीबाईनी मोडीत काढली व मुलींना देखील मुलांच्या बरोबरीने शिकण्याचा हक्क असल्याची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवली.आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत याचे सर्व श्रेय सावित्रीबाईना असल्याचेही त्यांनी सांगितले.

याच प्रसंगी आयोजित कार्यक्रमात दहावीतील ८२ विद्यार्थ्यांना ए.एस.एन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले.विद्यालयाचे प्राचार्य अशोक सरोदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नसीमा काझी, अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात,ज्योत्स्ना दरेकर, प्रमिला मोहिते, शिवाजी पाखरे, विशाल सोनवणे, पुनम ढमढेरे, अर्चना टेमगिरे, दिलीप बांबळे या सर्वांसहित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी अशोक सरोदे,रावसाहेब थोरात व दिव्या खेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या