अश्या होत्या राजमाता,राष्ट्रमाता,माँ साहेब जिजाऊ

Image may contain: Balasaheb Shelke, closeup
आज १२ जानेवारी हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता जिजाऊ यांची आज जयंती.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि स्वराज्य रक्षक संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला.जिजाऊंचे माहेरचे पूर्ण नाव जिजाबाई लखुजी जाधव. अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ...! जिजाऊ लहानपणापासून चुणचुणीत, चाणाक्ष, बुद्धीने तेज होत्या. जिजाऊंच्या पहिल्या शिक्षिका त्यांच्या आई म्हाळसाराणी साहेब या  म्हाळसाराणी लहानग्या जिजाऊला रामायण महाभारतातील शूर वीरांच्या स्वाभिमानी स्रियांच्या आणि नीती शिकवणाऱ्या ऋषी मुनींच्या गोष्टी सांगायच्या.

म्हाळसाराणी या केवळ पुराणातच अडकून पडणाऱ्या नव्हत्या.त्यांनी आपल्या मराठे पूर्वजांनी विजयनगर आणि देवगिरी चे मोठे राज्य कसे उभारले त्यांच्या राज्यात रयत कशी सुखी होती हेही समजावून सांगायच्या.रोज रात्री म्हाळसा आईच्या मांडीवर डोकं ठेवून या कथा ऐकत ऐकत जिजाऊ झोपेच्या अधीन होत असत.जिजा या शब्दाचा अर्थ जिजाऊंना सांगताना म्हाळसाराणी भावुक व्हायच्या.जिजा म्हणजे तुळजाभवानी ...! जिजा म्हणजे जय विजय...! म्हाळसाराणी जिजाऊंना म्हणतात कि विजयगाथा रचणारी ती जिजा ती आदिमाया तुझ्या स्वरूपात माझ्या पोटी आली.असं सांगूण त्या जिजाऊंचा आत्मविश्वास आणि महत्त्वकांक्षा फुलवायच्या.राजे दत्तोजी हे जिजाऊंचे थोरले बंधू त्यांचीही जिजाऊंवर अपार माया.त्यांनीच जिजाऊंना घोड्यावर बसून रपेट मारायला शिकवले तसेच तलवार चालवण्याचे प्रशिक्षण दिले.नंतर घोडदौडीत जिजाऊ ह्या आपल्या बंधू दत्तोजी यांना मागे टाकत.

जिजाऊ यांचे वडील लखुजी यांनी जिजाऊंना युद्ध शास्रातील शिक्षणाबरोबरच राजकारण,न्यायनीती यांचेही धडे दिले.तर रयतेच्या तक्रारींचे न्याय निवाडे करताना लखुजी राजे आपल्या कन्येला जिजाऊला जवळ घेऊन बसत.न्यायनिवाड्याची प्रक्रिया आणि न्यायाचा निर्णय बाळ जिजाऊ ह्या मोठया तन्मयतेने पहायच्या ऐकायच्या.राजे लखुजी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जिजाऊंना जवळ घेऊन बसवून भारताच्या दुर्दशेची माहिती सांगायचे.आपल्या मराठ्यांच्या राज्यामध्ये,सरदारांमध्ये एकी नव्हती.त्यामुळे हिंदुस्तानाला गुलामगिरीचे जीवण जगाव लागत.हे लखुजींनी आपल्या लाडक्या लेकीच्या कानात सांगितलं.आणि त्यासाठी आपण एकी करून रयतेचे साह्य घेऊन आपली गुलामगिरी उखडून फेकून देऊन आपण आपलं सुखाचं राज्य,स्वराज्य उभं केलं पाहिजे.हे भविष्यकालीन स्वप्न लखुजींनी जिजाऊंच्या मनबुद्धी आत्म्यात पेरून ठेवलं.

१२ जानेवारी १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेड राजा येथे म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी जे अद्वितीय कन्यारत्न जन्माला आले.ते म्हणजे जिजाऊ आणि ही गुणी पोर शहाजीराजे  भोसल्यांची अर्धांगिनी झाली.आणि त्यांनी १६०५ च्या रंगपंचमी अर्थातच फाल्गुन वद्य पंचमीला आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चातुर्य,चारित्र्य,संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ...! कर्तृत्व मनगटात उतरवण्यापूर्वी त्याला अगोदर मनात रुजवाव लागत.मडक्याचा आकार कुंभाराच्या हातावर आणि  त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर कल्पना क्षमतेवर अवलंबून असतो.कर्तृत्ववान पुरुषांचही हेच सूत्र आहे.हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र ज्यांनी घडविला.शहाजीराजांना सदैव वाघिणीच पाठबळ देऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढ ज्यांनी रोवली.आत्मविश्वास हरवून गुलामगिरीत चाचपडत बसलेल्या तमाम रयतेची माऊली बनून ज्यांनी आधार दिला.जोपर्यत चंद्र सूर्य आहे तोपर्यत ज्यांची माता म्हणून कीर्ती अबाधित राहिल अशा महामाऊली,महामाता,राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अर्थातच जिजाबाई शहाजीराजे भोसले.

जिजाऊंचा विवाह डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये शहाजीराजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे झाला.तेव्हा दोन तेजस्वी जीव एकत्र आले.नंतर जिजाऊंचे वडील लखुजी जाधव व त्याचे पती शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला.तरीही जिजाऊ आपल्या पतीशी म्हणजे शहाजी राजांशी एकनिष्ठ राहिल्या.त्यांनी आपल्या माहेराशी असलेले संबंध तोडले.नंतर त्यांनी भवानी मातेलाच साकडं घातलं तेजस्वी पराक्रमी असलेला पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल असं म्हणत जिजाऊंनी भवानी मातेकडे पदर पसरला पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून पहात होत्या.भवानी मातेला जिजाऊंच हे मागण मान्य करण भाग होत.कारण जे दुख जिजाऊंच होत तेच दुःख भवानी मातेच होत.तिचा धर्म बुडत होता.तिची मंदिर पाडली जात होती.मूर्ती तोडल्या जात होत्या.भवानी मातेला एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती.त्या दोघींच्या गरजा दोघींची दुःख एकच होती.त्यांचं लक्ष एक होत,स्वप्न एक होत.या स्वप्नांचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला.आणि या शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायभरणीला सुरुवात झाली.

कोणत्याही स्त्रीच्या पोटात बाळ असताना काम करण्याची इच्छा होत नाही.त्यांची इच्छा असते आपण आराम करावा.पण माँ साहेब जिजाऊ खुप पराक्रमी,कर्तृत्ववान होत्या.त्यांच्या पोटात बाळ असताना त्यांना त्या अवस्थेत अस वाटायचं आपण तलवार बाजी करू.त्यांना वाटायचं आपण दांडपट्टा चालवु .त्यांना वाटायचं आपण घोड्यावरून स्वारी करू.त्यांना वाटायचं आपण एकून एक मुघलांच्या शीर त्यांच्या धडा पासून वेगळी करू.अश्या होत्या त्या वेळच्या जिजाऊ.आणि आजच्या जिजाऊ  त्यांच्या तर डॉक्टर कड चकरा मारुनच चपला झिजतात.जिजाऊंनी शिवबांना महापुरुषांच्या कथा सांगुन इतके प्रभावशाली केले की त्यांनी स्वतः स्वराज्य स्थापन केले.पण आजच्या आधुनिक आईला इतकाही वेळ नाही.की ती आपल्या मुलांना महापुरुषांच्या गोष्टी सांगू शकेल.आजची मुले आजची पिढी ही सतत टी.व्ही कडे आकर्षित झालेली आहेत.याचेही आईला भान नसते.पण माँसाहेब जिजाऊ अशा नहूत्या.त्या शिवरायांना नेहमी सांगत रयतेसाठी लढा द्या,मानाचे राज्य निर्माण करा,स्वराज्य निर्माण करा,इतिहास घडवा.

पण आजची आई सांगते.मुला तू कोणाच्याही भानगडीत पडू नकोस.आपल्याला काय करायचं आहे.म्हणूनच आजची पिढी ही आत्मकेंद्रित बनत चालली आहे.जिजाऊंनी जर असा विचार केला असता तर शिवाजी राजांसारखे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घडले नसते आणि आपण गुलामगिरीतून कधीही सुटलो नसतो.आजकाल सर्वजण म्हणतात राजे पुन्हा जन्माला या अहो कसे राजे जन्माला येतील त्या आधी प्रत्येक घराघरात जिजाऊ जन्माला याव्या लागतील.तर राजे जन्माला येतील.आज आपल्या घरात जिजाऊ जन्मली तरच तिच्या पोटी शिवाजी महाराजांसारखे कर्तृत्ववान पुरुष जन्माला येतील.जिजाऊंच्या मस्तकी त्याच्या माय-बापांनी संस्कारांचा टिळा लावला.हाती स्वाभिमानाची तलवार दिली.वर्तमान बदलण्याचे विचार दिले.इतिहास घडविण्याची नजर दिली.दुर्दम्य इच्छाशक्तीन त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीज पेरली आणि म्हणूनच मानवमुक्ती महासंगम कल्याणकारी राजाच्या आदर्श निर्माण करणाऱ्या माता राजमाता जिजाऊ ह्या ठरल्या.स्वराज्य संकल्पीका मातृत्वाच्या गौरवाचा मानबिंदु ज्या शिवबान प्रस्थापित केला अशा पुरुषोत्तमाची माता म्हणजे राजमाता जिजाऊ.

जिजाऊंना एकून सहा अपत्ये झाली.जिजाऊंना पहिले अपत्ये झाले त्याचे नाव संभाजीराजे ठेवण्यात आले.नंतर चार अपत्ये झाली पण दुर्दैवाने ती चारही अपत्ये मृत्यू पावली.आणि सहावे अपत्य १९ फेब्रुवारी १९३०रोजी फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना पुत्ररत्नाचा लाभ झाला म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.जिजाऊंचे पती शहाजीराजे हे फार पराक्रमी होते.शहाजीराजांनी पुण्याजवळील अहमदनगर व विजापूर प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले.परंतु विजापूराने ते उध्वस्त केले.इ.स.१६३९ ते १६४७ या काळात शहाजी राजांनी पुण्यात जांबर पाटलांकडून जागा विकत घेऊन लाल महाल नावाचा राजवाडा बांधला.जिजाऊ व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालात होता.जिजाऊंच्या आज्ञेत शिवाजी महाराज सवंगड्यांसोबत युद्ध कला शिकू लागले.तानाजी मालुसरे,सूर्याजी काकडे,येसाजी कंक,बाजी ही शेतकऱ्यांची मुले शिवाजीचे जिवलग मित्र झाले.हे सर्व जण जिजाऊंच्या आज्ञेनुसार वागत असत.

जिजाऊ माँ साहेबांना आदर्श माता,राजमाता म्हणून कालही सन्मान होता.आजही आहे आणि अनंत काळ भविष्यातही असणार आहे.याचे कारणही तसेच आहे.मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचे ध्येर्य ठरवून ते पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या जिजाऊ होत्या.शहाजी राजे बंगळुरात स्वारीवर असताना आपल्या मुलासाठी आईबरोबर वडिलांचीही जबाबदारी त्या तितक्याच क्षमतेने पार पाडणाऱ्या आपल्या माँ साहेब जिजाऊ होत्या.नात्यांना भावनांना कुरवाळत न बसता.कर्तव्यपूर्तीसाठी खंबीरपणे आलेल्या प्रत्येक संकटांना सामोरे जाऊन स्वराज्यातील रयतेचे रक्षण करणाऱ्या आपल्या जिजाऊ होत्या.माँ साहेब जिजाऊ ह्या काही साधारण स्त्री नव्हत्या.त्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला.जिने प्रत्येक मावळ्यांत शिवबा घडवला.

तिने वेळोवेळी पत्नी म्हणून शहाजीराजांना धीर दिला.माँसाहेब जिजाऊंनी शिवबाच्या मातृत्वाबरोबरच गुरुत्वही स्वीकारलं.जिजाऊ ह्या आई म्हणून खरचं आदर्श माता आहेत.त्यांनी दिलेले ज्ञान हे एखाद्या ग्रंथाप्रमाणे पवित्र आणि प्रभावशाली होते.राजमाता जिजाऊ आपल्या मुलाला घडवण्याची कामगिरी करत होत्या.शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात धडापासून वेगळे केले जातील अशी सिंहगर्जना करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजीराजे भोसले."सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्यांची"असे म्हणणारे संभाजीराजे भोसले.या दोन पराक्रमी व्यक्तीचे व्यक्तीमहत्व घडवले ते माँसाहेब जिजाऊंनी.माँसाहेब जिजाऊ तलवारीची धार होत्या,समुद्राच्या शान होत्या,वाऱ्याचा वेग होत्या,मराठयांची मान होत्या कारण त्यांनाही कर्तृत्वाची जाण होती,हिंदुत्वाची जाण होती.

जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या.त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या.सीतेचे हरण करणाऱ्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता.दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले,तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते.जे पारतंत्र्यात असताना त्यांना स्वतंत्र मिळवून देणे,हि त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती.प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती.कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे "स्वराज्य" स्थापना करणे ही शिवरायांची धारणा झाली.ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळे शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली.समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिल.त्यांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवलं.शहाजी राजांची कैद व सुटका अफजलखानाचे संकट आग्रा येथून सुटका अश्या अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले.शिवराय मोठया मोहिमांवर असताना,स्वतः जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.

कोणताही मुलगा आईकडून सदाचार व प्रेम घेतो आणि वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतो.पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत.शहाजीराजांच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या.या संस्कारांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वर्षांची गुलामगीरी मोडून काढली.शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यात असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाऊ मोठया कौशल्याने पार पाडत होत्या.शिवाजी राजे १४ वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्त केली.अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाऊं वर येऊन पडली.अनेक सरदारांना सोबत घेऊन जिजाबाई आणि बाल शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले.जिजाऊंनी शिवाजी राजेंच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली.

१६ मे १६४० साली जिजाऊंनी शिवाजींचा विवाह निंबाळकरांच्या सई बाईशी लावुन दिला.जिजाऊंचे थोरले पुत्र म्हणजे संभाजी हे शहाजी राजांच्या संगोपनात वाढत होते.तर धाकटे पुत्र शिवाजी हे जिजाऊंच्या संगोपनात वाढत होते.स्त्रीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी अशी एक जिजाऊंच्या विषयी ओळ म्हणजे मातृत्वाच्या अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच...! युगपुरुष शिवराय घडले,वाढले आणि निश्चयाचा महामेरू...! बहुता जणांशी आधारू...! श्रीमंतयोगी असे ज्यांचे वर्णन केले जाते.ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची,निरागृही मातेची,आणि वीरमाता,माँसाहेब जिजाऊंची,राजमाता जिजाऊ साहेबांची.शिवनेरीच्या अंगाखांद्यावर शिवबांना लहानाचा मोठा करताना सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला शिकविताना शिवरायांना महाभारत रामायणातील राम आणि कृष्णाच्या गोष्टींचे बोधमृत पाजताना स्वराज्य स्थापनेचे बाळकडू पाजले.हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा आहे हा मूलमंत्र त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात उतरविला.ती मातृशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या.

खर तर आज २१ व्या शतकात स्वराज्य हरवत चाललंय.माँ साहेब जिजाऊंनी स्वतःच आयुष्य ह्या समाजाच्या जडणघडणीसाठी पणाला लावलं.एक पत्नी म्हणून त्यांनी धीरान शहाजी राज्यांच्या सोबत त्या उभ्या राहिल्या.शिवबांच्या मातृत्वासाठी त्यांनी त्याच गुरुत्वही स्वीकारलं.खर सांगायचं झालं तर शिवरायांचे गुरू कोण तर माँसाहेब जिजाऊ होत्या.प्रत्येक मुलाची आई ही त्याची गुरुच असते.पण आजकाल च्या स्रिया ते विसरत चालल्यात.माँ साहेबांनी आपल्याला शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवुन दिला.पण आपलं माँ साहेब जिजाऊंना काहीच देऊ शकलो नाही.हेच आपल दुर्दैव.पण त्यांनी घडवलेला इतिहास तरी कायम लक्षात ठेवा.जिजाऊ ह्या खूप जिद्दी आणि कर्तृत्ववान होत्या.महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र पेरलं.अशा छत्रपती संभाजी महाराज्यांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आजीनी पेरलं त्या आई म्हणजे माँ साहेब जिजाऊ होत्या.त्या फक्त शिवबांच्या आई आणि संभाजींच्याआजी नहूत्या तर त्या अवघ्या महाराष्ट्राच्या आई होत्या.म्हणुन राजमाता,राष्ट्रमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते.नंतर शिवाजी राज्यांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर  बारा दिवसांनी १७ जून इ.स.१६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला.आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी माँ साहेब जिजाऊंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धपकाळाने त्याचे निधन झाले.

शेवटी एवढंच म्हणावंस वाटत...

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभु छावा...!!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा...!!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे...!!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे...!
मुजरा माझा त्या माँ साहेब जिजाऊंना घडविले तिने त्या शुर शिवबाला...!!
साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी...!!
मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा...!!
तो एकच होता माझ्या माँ साहेब जिजाऊंचा छावा...!!

जय जिजाऊ...जय शिवराय...!!

किरण दिपक पिंगळे ( रांजणगाव गणपती )
९३७३५४१३०८

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या