Video: भय इथले संपत नाही...

No photo description available.
गुनाट, ता. १४ जानेवारी २०१९ ( सतीश डोंगरे ): शिरूर तालुक्यातील गुनाट गावाच्या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला गेल्या महिनाभरात सुमारे ११ जनावरांवर हल्ला करुन ठार केले आहे. या बिबट्याची गुनाट गावात दहशत पसरली असून, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

शुक्रवारी (दि १०) रोजी गुनाट गावच्या जवळच चिंचणी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस चासकमान कालव्यालगत खंडू हाके यांचा शेळ्या - मेंढ्यांचा कळप मुक्कामाला होता.जवळच असणाऱ्या उसाच्या फडातून बिबट्याने कळपावर हल्ला चढविला व तीन शेळ्यांना उसाच्या शेतात नेऊन त्यांचा फडशा पाडला.गुनाट गावाच्या परीसरात बिबट्याची संख्या एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.गेल्या आठवड्यात ही बिबट्याने एका शेतकऱ्याची मेंढी फस्त केली होती. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्र जागून काढत आहेत. मजूरांनीही बिबट्याचा धसका घेतला असून शेती कामासाठी मजूर मिळात नसल्याची माहिती गुनाट ग्रामस्थांनी दिली आहे.

याबाबत शिरुरचे  वनक्षेत्रपाल मनोहर म्हैसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले कि,शेतकऱ्यांनी शेतात जाताना शक्यतो एकटे जाऊ नये. मोठा आवाज करत शेतात काम करावे.आवाजाला घाबरुन बिबट्या जवळ येत नाही. तसेच या भागात वनविभागाच्या वतीने पिंजरा पण लावण्यात आलेला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या